mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

‘विठ्ठल’ वरील राज्य बँकेच्या कारवाईला अखेर स्थगिती; ‘इतक्या’ महिन्यांची मुदतवाढ मिळल्याचा दावा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 15, 2021
in राज्य, सोलापूर
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

टीम मंगळवेढा टाईम्स ।

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या श्री.विठ्ठल साखर कारखान्यावरील थकीत कर्जापोटी राज्य सहकारी बँकेकडून जप्तीच्या कार्यवाहीला अखेर स्थगिती मिळाली.

संचालक युवराज पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान पुणे कर्ज वसुली न्यायाधिकरणने ( डीआरटी ) ही कारवाई पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याचे आदेश दिले.

आर्थिक अडचणींमुळे कारखाना यंदा बंद ठेवण्यात आला आहे. गत हंगामातील शेतकऱ्यांची ऊस बिले कामगारांच्या पगारी , ऊस तोडणी वाहतूकदारांची देणी थकलेली आहेत.

याचवेळी राज्य सहकारी बँकेच्या थकीत कर्जापोटी १४ डिसेंबर रोजी ताबा घेण्याची अंतिम नोटीस बजावली होती . दरम्यान , ही कारवाई होऊ नये , यासाठी चेअरमन भगीरथ भालके ‘सहकार शिरोमणी’चे कल्याणराव काळे, तर दुसऱ्या बाजुने संचालक युवराज पाटील यांच्या गटाकडून प्रयत्न सुरू होते.

भालके व काळे यांच्यासह कांही संचालकांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेत कारवाईला स्थगिती देण्याचा आग्रह धरला होता.

संचालक मंडळाने येथे बैठक घेऊन कर्जाला ३ महिने मुदतवाढ मिळावी, असा ठराव करून पाठविला होता.

दरम्यान, संचालक युवराज पाटील प्रविण भोसले ( सरकोली ) , संजय पाटील ( रोपळे ) या सभासदांनी  अँड.सतीश तळेकर यांच्यामार्फत कर्जवसुली प्राधिकरणकडे याचिका दाखल केली होती.

त्याची सुनावणी ही मंगळवारी होती. त्यामुळे बँकेकडून मंगळवारी जप्तीची कारवाई होणार की स्थगिती मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंगळवारी सकाळी पुणे ‘ डीआरटी ‘ प्राधिकरणकडे सुनावणी झाली.

त्यामध्ये न्यायालयाने पुढील आदेशापर्यंत परिस्थिती ‘जैसे थे ठेवत बँकेच्या कारवाईला स्थगिती दिली. याबाबत बँकेला कळविण्यात आल्याचे युवराज पाटील यांनी सांगितले.

३ महिन्यांची मुदतवाढ मिळल्याचा दावा

दरम्यान, शेवटच्या टप्प्यात बँकेसोबत तडजोड होऊन २५ लाख रुपये भरून ३ महिन्यांची मुदतवाढ मिळल्याचा दावा भालके गटाने केला आहे.

कारखान्यावर सभासदांची गर्दी राज्य बँकेकडून कारवाई होऊ नये व पैसे भरण्यास ३ महिने मुदतवाढ मिळावी यासाठी दोन्ही गट प्रयत्नशील होते.

तरीही बँकेने कार्यवाही करण्याचा प्रयत्न केल्यास ते हाणून पाडण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर संचालक युवराज पाटील , नारायण जाधव , गोकुळ जाधव , राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अॅड . गणेश पाटील , अॅड . दीपक पवार , भारत भोसले , प्रशांत देशमुख,

माऊली हळणवर , प्रवीण भोसले आदींसह शेकडो सभासद , कार्यकर्ते तळ ठोकून होते.

यादरम्यान , आरोप – प्रत्यारोपांची सभाही रंगली. दुपारी कारवाईला स्थगिती मिळाल्याचे समजताच जल्लोष करण्यात आला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
धक्कादायक : मंगळवेढ्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाची आत्महत्या

आई मला माफ कर…! 23 वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; नोट वाचून पोलीसही हादरले

February 17, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

February 16, 2026
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! साता-बारा होणार कोरा, राज्यात शेतकरी कर्जमाफीचा दिवस ठरला; ‘या’ दिवशी होणार घोषणा

February 15, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

पतीच्या निधनाचा धक्का! पत्नीनेही सोडले प्राण, एकाच सरणावर दोघांवर अंत्यसंस्कार; साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

February 16, 2026

खळबळ! हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात डल्ला मारणारा मंगळवेढ्याचा व्यावसायिक गजाआड; सव्वाआठ लाखांचे दागिने जप्त

February 13, 2026
Next Post
म्युच्युअल फंड हा गुंतवणूक करण्याचा एक चांगला आणि प्रसिद्ध पर्याय, जाणून घ्या सविस्तर

सोलापुरात साडेतीन हजार प्रस्तावांपैकी फक्त दहा प्रस्तावांना मंजुरी; आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक

ताज्या बातम्या

घाम फोडला! रोमांचक मॅचमध्ये टीम इंडियाचा धमाकेदार विजय; पाकिस्तानला मोठा धक्का

भारताच्या मार्गातील ‘मोठा’ अडथळा दूर झाला! Super 8s मध्ये आता लिंबूटींबू संघ दिसणार;  वेळापत्रक फिक्स, पहिलाच सामना हायव्होल्टेज, कुणाचं आव्हान?

February 18, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मोठी बातमी! राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले; सोलापूर जिल्ह्यातील ७५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेला ‘या’ तारखेपासून सुरुवात

February 18, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

February 18, 2026
खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

खुशखबर! ‘हॉटेल महालोक’ फॅमिली रेस्टॉरंटचा आज मंगळवेढ्यात दिमाखदार शुभारंभ; एकनाथ शिंदे, मंत्री गोगावले, सोमवरनाथ महाराज, अलका कुबल या दिग्गजांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा

February 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

पंचायत समिती नंतर जिल्हा परिषदेच्या निवडी; नव्या सदस्यांचे गॅझेट झाले प्रसिद्ध; निवडणूक कार्यक्रम होणार लवकरच जाहीर;..अशी असेल पुढची प्रक्रिया…

February 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..