टीम मंगळवेढा टाईम्स पंढरपूर : राजेंद्र फुगारे
सध्या सोलापूर जिल्ह्यातील पाऊसकाळ न झाल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या कमतरतेमुळे सर्वत्र बिकट अवस्था झाल्याने जनावरांचा चारा आणि पिण्याचे पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
दि.३०ऑगस्ट रोजी मुंबई येथे श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन दिले.
तसेच पाण्यामुळे पिके करपू लागली आहेत. भिमा नदी पात्र कोरडे असुन नदी व कॅनोलला पाणी सोडावे याबाबत ही चेअरमन अभिजीत पाटील यांनी सविस्तर चर्चा केली.
येत्या दोन दिवसांत बैठक लावण्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी दिले असून सकारात्मक विचार होईल असा विश्वास व्यक्त केला.
कठीण परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या आम्ही पाठीशी आहोत. चाऱ्याअभावी या मुक्या जनावरांचे होणारे हाल थांबविण्यासाठी प्रयत्न करीन आहोत असे अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज