mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरकरांच्या रेट्यामुळे आजपासून व्यापारपेठ खुली; शहरातील दुकाने आजपासून ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 4, 2021
in सोलापूर
सोलापूरकरांच्या रेट्यामुळे आजपासून व्यापारपेठ खुली; शहरातील दुकाने आजपासून ‘या’ वेळेपर्यंत राहणार सुरू

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने आजपासून सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत खुली करण्यास महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी गुरुवारी रात्री परवानगी दिली. शनिवार व रविवारी दुकाने बंद असतील.

शहरात लॉकडाऊनचे निबंध कायम राहिल्याने व्यापारी, कामगार नेते रस्त्यावर उतरले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महापालिकेला स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून मान्यता दिली आणि आयुक्तांना निर्णयाचे अधिकार दिले. त्यानुसार आयुक्त पी.शिवशंकर यांनी गुरुवारी रात्री आदेश जारी केले.

शुक्रवार सकाळपासून व्यापारपेठ खुली होत आहे. परंतु, दुकानांची वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुपारी ३ वाजल्यानंतर शहरात संचारबंदी असेल. अत्यावश्यक कारणांशिवाय फिरता येणार नाही.

हे सुरू असेल सुरू राहतील.

सर्व बँका सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट व बार हे पार्सल सेवेकरिता सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील. दुपारी २ ते रात्री ८ पर्यंत फक्त घरपोच सेवा.

मद्य विक्री, रेशन दुकाने, केशकर्तनालये, इलेक्ट्रिक-इलेक्ट्रॉनिक्स, गॅरेज , कपडे यासह इतर सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील.

सर्व शासकीय कार्यालये २५ टक्के अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत – कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू राहतील.

दुकानदारांना अट

दुकाने सुरू करताना मालक, चालक, कामगार यांची कोरोना चाचणी केलेले अहवाल असणे बंधनकारक आहे किंवा लसीकरण केलेले प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

यंत्रमाग, विडी उद्योगाला परवानगी पण …

यंत्रमाग, गारमेंट व विडी उद्योग यांना सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत परवानगी असेल . मात्र या कारखान्यांना कोरोनाचे नियम लागू असतील असे आयुक्तांनी म्हटले आहे.

शिवाय कोरोना चाचणी व लसीकरणाचे प्रमाणपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. यावरुनही कारखानदार आणि प्रशासनात वाद होण्याची शक्यता आहे.

सर्व धार्मिक स्थळे, मॉल बंदच राहणार धार्मिक स्थळे , स्विमिंग पूल बंद ठेवण्याचे आदेश कायम आहेत. मंगल कार्यालयांना परवानगी आहे.

मात्र २५ जणांच्या उपस्थितीत कोरोनाचे नियम पाळून समारंभ करणे आवश्यक आहे. शॉपिंग सेंटर, मॉल सुरू करण्यास परवानगी नाही. एकल दुकानांना परवानगी आहे. त्यामुळे शहरातील शॉपिंग सेंटरमधील एकल दुकाने सुरू ठेवता येतील.

सोलापूरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास

जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी शहर व जिल्ह्याला निर्णयाची मोकळीक मिळावी असा नवीन प्रस्ताव पाठविला. त्याला मंजुरी मिळणार की नाही याची धाकधुक सोलापूरकरांत होती.

पुनर्वसन मंत्र्यांनी १८ जिल्हे लॉकडाऊनमुक्त करण्याची घोषणा केली. त्यात सोलापूर तिसऱ्या टण्यात होते. पण लगेच हा निर्णय झाला नसल्याचे सरकारने जाहीर केले आणि संभ्रमात भर पडली.

सोलापूरला परवानगी मिळणार का ? असाही प्रश्न पडला.पण रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान राज्य सरकारचा निर्णय आला आणी सोलापूरकरांनी सुटकेचा निश्वास टाकला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

संतापजनक! ​रात्री सर्वांसोबत जेवण, सकाळी खोलीत आढळला मृतदेह; लग्नानंतर अवघ्या चौथ्या दिवशी नेमकं काय घडलं?

October 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो लक्ष द्या! २७ ऑक्टोबरला शाळा-अंगणवाड्यांत मिळणार मोफत ‘या’ गोळ्या; जाणून घ्या संपूर्ण नियोजन

October 24, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

मंगळवेढ्यात राजकीय प्रतिष्ठा पणाला! राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, भाजपची ताकद पणाला; दुष्काळाच्या सावटात मतदानाचा टक्का कोणाचा गेम करणार?

October 23, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

सक्तीने कर्जवसुली कराल तर खबरदार..! मायक्रो फायनान्स, खासगी सावकारांना जिल्हाधिकाऱ्यांचा थेट कारवाईचा इशारा; शेतकऱ्यांशी २४ तास संवाद : टँकर, चाऱ्यासह सर्वांची व्यवस्था होणार

October 20, 2026

जमिनीच्या तुकड्यासाठी नात्यांचा खून! सासर्‍याने सुनेच्या डोक्यात घातला कुऱ्हाडीचा दांडा; सासूने दिली थेट जिवे मारण्याची धमकी

October 21, 2026
रोहित पवारांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील ‘हा’ साखर कारखाना चालविण्यास

महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज मंगळवेढ्यात; पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा दौरा

October 19, 2026
Next Post
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! व्यवसाय चालत नाही, लग्न जमत नसल्याने मंगळवेढ्यातील तरुणाची दुकानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या बातम्या

सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

​मांजराने उघड केला चोरीचा कट! झोपेत असताना घरात शिरला चोरटा; देव्हाऱ्याखालून सोन्याचे दागिने पळविले; मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल

October 30, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकरी अन् नागरिकांच्या मदतीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; दुष्काळी ‘वॉर रूम’ सुरू, ६ अधिकाऱ्यांची नियुक्ती; ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

October 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

खतांसाठी रांगा विसरा, मोबाईलवरूनच घरबसल्या करा बुकिंग; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

October 29, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राष्ट्रीय जंतनाशक दिनी सोलापूर जिल्ह्यात ८ विद्यार्थ्यांना गोळ्यांची रिॲक्शन; पालकांमध्ये भीतीचे वातावरण; रुग्णालयात मुलांवर उपचार सुरू

October 29, 2026
शेतकऱ्यांनो! आता यापुढे दुष्काळाच्या झळा बसणार नाहीत; तामदर्डीत बंधाऱ्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्षात सुरवात; माचणूरात आज आ.आवताडे यांचा नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन

मंगळवेढ्याच्या दक्षिण भागाचा पाण्याचा वनवास संपणार! आमदार आवताडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश; १९ गावांसह साठवण तलावांना थेट पाईपलाईनने मिळणार पाणी

October 29, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

महिलांनो! मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’मध्ये खरेदीदारांची तुफान गर्दी; ‘माहेश्वरी साडी महोत्सव’ आणि हमखास गिफ्ट ऑफर्सचा धमाका

October 28, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा