टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा परिषद स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली असून यंदाच्या या हिरक महोत्सव कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषद मार्फत मागील ६० वर्षामध्ये ग्रामीण भागातील विकास व ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान उंचावणे
व गावोगावी पायाभूत व मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यामध्ये विशेष कार्य व योगदान केलेल्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते आज शुक्रवार १३ मे २०२२ रोजी दुपारी १ वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
यांचा सत्कार होणार
माजी अध्यक्षांमध्ये विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, काकासाहेव रामचंद्र निंबाळकर, बाबुराव मारुती जाधव, फत्तेसिंह व्यंकटराव माने – पाटील , मदनसिंह शंकरराव मोहिते – पाटील , वैशाली लक्ष्मण सातेपुते,
सुमन वसंतराव नेहतराव, बळीराम भाऊराव साठे, डॉ.निशिगंधा प्रशांत माळी, जयमाला महादेव गायकवाड, आ.संजयमामा विठ्ठलराव शिंदे, अनिरुध्द विठ्ठल कांबळे यांचा समावेश आहे.
आर.आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत
मंगळवेढा तालुक्यातील लवंगी, अक्कलकोट तालुक्यातील भुरी कवठे, बार्शी तालुक्यातील यावली, करमाळा तालुक्यातील सरपडोह, माढा तालुक्यातील जामगाव, माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर,
पंढरपूर तालुक्यातील पुळूज, मोहोळ तालुक्यातील पापरी, उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, सांगोला तालुक्यातील अकोला,
दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या ग्रामपंचायतींनी उत्कृष्ट केल्याबद्दल आणि सन २०१७-२०१८ ते २०२०-२०२१ या कालावधीतील
सुमारे ४४ ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज