mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर जिल्हा परिषदेचे 50 टक्के उत्पन्‍न ‘या’ कारणांमुळे घटणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
सोलापूर जिल्हा परिषदेचे 50 टक्के उत्पन्‍न ‘या’ कारणांमुळे घटणार

 

टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना परिस्थितीमुळे राज्य शासनाने मुद्रांक शुल्कमध्ये सवलत दिली आहे. त्यामुळे मुद्रांक शुल्क व व अन्य योजनेच्या व्याजातून मिळणारे जिल्हा परिषदेचे उत्पन्‍न जवळपास निम्म्याने घटले आहे.

जिल्हा परिषद सेस फंडाचे 40 कोटींचे बजेट 20 कोटींपर्यंतच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे उत्पन्‍न वाढवून किमान दरवर्षीइतपत तरी निधी जमा करण्यासाठी जि. प. सदस्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणारी आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. 10 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत सदस्य सचिन देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या उत्पन्‍न वाढीसाठी काय उपाययोजना करण्यात आली आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

उत्पन्‍न वाढीसाठी सविस्तर आराखडा पुढील सभेत सादर करण्याचे आश्‍वासन अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिले होते. मात्र नुकत्याच झालेल्या सभेत त्यांनी याविषयावर सभेत कोणतीच माहिती सादर न केल्याने उत्पन्‍न वाढीचा विषय अलगद बाजूला गेला आहे.


जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजयमामा शिंदे यांच्या काळापासून जिल्हा परिषदेचे उत्पन्‍न वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र हा प्रयत्न केवळ प्रयत्नच राहत असून यात ठोस अशी हालचाल किंवा निर्णय घेण्यात अद्याप जिल्हा परिषदेला यश आले नाही.

मागील दोन वर्षांपासून काही पेट्रोल कंपन्यांकडून जिल्हा परिषदेच्या जागांची पाहणी करुन मागणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या पेट्रोलियम कंपन्यांना करार करुन उत्पन्‍न वाढीसाठी कोणताच निर्णय आतापर्यंत घेण्यात आला नाही.


जिल्हा परिषद मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत व्यापारी गाळे बांधण्याचा प्रस्तावही प्रशासनाकडे तयार आहे. मात्र याबाबतही ठोस असे यश गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांना मिळाले नाही. जिल्हा परिषदेला राज्य शासनाकडून यापूर्वी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात येत होता.

या निधीवर मिळणारे व्याजच जिल्हा परिषदेचे मोठे उत्पन्‍नाचे स्त्रोत होते. मात्र राज्य शासनाने आता काम पूर्ण झाल्याशिवाय जिल्हा परिषदेला निधी देणे बंद केला आहे. त्यामुळे व्याजातून मिळणारे उत्पन्‍न बंद झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून चांगला व्याजदर जिल्हा परिषदेच्या ठेवीवर देण्यात येत होता.

मात्र या बँकेची आर्थिक परिस्थिती पाहून मागील पदाधिकार्‍यांनी या बँकेतून ठेवी काढून कमी व्याजदर देणार्‍या बँकेत जिल्हा परिषदेच्या ठेवी हस्तांतरीत केल्या आहेत.


कोरोना परिस्थितीमुळे यंदा जिल्हा परिषदेला 20 कोटी रुपये तरी उपलब्ध होतील की नाही, याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे उत्पन्‍न वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी व अधिकार्‍यांना ठोस असा निर्णय घेण्याची गरज व वेळ आली आहे.

याबाबत जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती विजयराज डोेंगरे, सीईओ प्रकाश वायचळ यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणारी आहे.

Solapur Zilla Parishad decreased

50% income of due to ‘these’ reasons

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा