मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
स्वयंपाक करित असताना रॉकेलचा भडका उडाल्याने महिला जखमी झाल्याने उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले आहे .
राजश्री सुभाष सलगरे ( वय २७ , रा . सलगर , ता . अक्कलकोट ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे . सलगरे या गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास राहत्या घरामध्ये चुलीवर स्वयंपाक करित होत्या .
त्यांनी चुलीवर रॉकेल ओतल्याने भडका उडाला . यामध्ये जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज