टीम मंगळवेढा टाईम्स । चोर समजून दोघांना लोखंडी गज व काठ्यांनी बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले . हि घटना माढा तालुक्यातील चव्हाणवाडी गावात घडली. याप्रकरणी चव्हाणवाडी गावातील सात जणा विरोधात टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तुषार सुखदेव बनगर व प्रवीण आबा शेंबडे ( दोघे रा.मोटेवाडी ता.माढा ) अशी मारहाणीत जखमी झालेल्याची नावे आहेत.
हे दोघेजण जेवणखान करून पालावर वस्तीच्या ठिकाणी चालत निघाले असताना त्यांना चव्हाणवाडी येथील महेश बनसोडे, हर्षद काळे , शिवाजी भालेराव व अन्य चार जणांनी चोरटे असल्याच्या संशयाने मारहाण करून जखमी केलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज