मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर शहरबरोबर ग्रामीण भागातील ही कोरोनाने हाहाकार माजवला असून एकीकडे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढतच असताना दुसरीकडे सोलापूरकरांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे बार्शी तालुक्यातील वैराग येथे दोन वर्षांची चिमुकली तिच्या वाढदिनीच कोरोनामुक्त झाली. त्यामुळे तिचे सर्वांनीच गुलाबपुष्प देऊन आनंद व्यक्त केला. या बरोबरच एका ऐंशी वर्षांच्या वृद्धांनीही कोरोनावर मात केली. Solapur barshi vairag Two year old girl and eighty year old grandfather Koronamukta
बार्शी तालुक्यात बुधवारी ३५ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये दोन व चार वर्षांच्या चार लहान मुलीसह सत्तर व ऐंशी वर्षांच्या वृद्धांचा समावेश असल्याने येथील कर्मचाऱ्यांनी सर्वांना गुलाब पुष्प देऊन घरी पाठवले. कोविड सेंटरचे नोडल अधिकारी डॉ. अजित सपाटे यांनी ही माहिती दिली.
आत्तापर्यंत १६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून पैकी १०७ रुग्ण बरे झाले आहेत. अद्याप ४५ रुग्णांवर उपचार चालू आहेत. दरम्यान, सर्व प्रशासन यंत्रणांचे चांगले काम व त्यास नागरिकांनी दिलेला उत्तम प्रतिसाद यामुळे रुग्ण वाढीचा आलेख सत्तर टक्क्यांनी उतरून तो तीस टक्क्यांवर आला असल्याची माहिती आरोग्यसेविका शोभा मस्के यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज