टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 316 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर आज रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन 707 जण घरी सुखरूप परतले आहेत. तर कोरोनामुळे आज जिल्ह्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
आज 2 हजार 497 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 181 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 316 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत 23 हजार 561 जण कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनामुळे 645 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
कोरोना झाल्यामुळे अद्यापही 6 हजार 70 जण वेगवेगळ्या रूग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार घेऊन बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या 16 हजार 846 एवढी आहे.
आज ‘या’ गावातील 12 जणांचा मृत्यू
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज मंद्रूप येथील 55 वर्षाची महिला, खंडाळी (ता. माळशिरस) येथील 71 वर्षाचे पुरुष, टाकळी रोड पंढरपूर येथील 70 वर्षाची महिला, अनगर (ता. मोहोळ) येथील 50 वर्षाचे पुरुष, दहिटणे (ता. बार्शी) येथील 82 वर्षांचे पुरुष,
तर डाळी गल्ली पंढरपूर येथील 72 वर्षाचे पुरुष, कोळगाव (ता. करमाळा) येथील 58 वर्षाचे पुरुष, नातेपुते (ता. माळशिरस) येथील 70 वर्षाचे पुरुष, खैरेवाडी (ता. माढा) येथील 80 वर्षाचे पुरुष, एखतपूर (ता. सांगोला) येथील 75 वर्षांचे पुरुष, कोर्टी (ता. पंढरपूर) येथील 80 वर्षाचे पुरुष, येणकी (ता. मोहोळ) येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात आज 66 पॉझिटिव्ह
सोलापूर शहरात एकूण टेस्टिंगपैकी 12 टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळत आहेत. तरीही टेस्टिंगची संख्या वाढलेली नाही. आज शहरात 494 संशयितांमध्ये 66 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर दक्षिण कसबा परिसरातील सोन्या मारुतीजवळील एकाचा 81 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
आशीर्वाद नगर, कल्याण नगर, निर्मल नगर (मजरेवाडी), मोरेश्वर अपार्टमेंट (दक्षिण कसबा), शाहीर वस्ती (भवानी पेठ), बॉईज हॉस्टेल (सिव्हिल हॉस्पिटल), रंगभवन, पोलिस मुख्यालय, आत्मविश्वास नगर, राजीव नगर, एक नंबर झोपडपट्टी, यतीनखानाजवळ, पापाराम नगर (विजयपूर रोड), सैनिक नगर (डब्ल्यूआयटी कॉलेजजवळ), न्यू पाच्छा पेठ, भारतरत्न इंदिरा नगर, राघवेंद्र नगर (सैफूल), आर्य चाणक्य नगर,
तर बालाजी हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), जगदंबा चौक (लष्कर), सहारा नगर, वेदांत रेसिडेन्सी, संजना अपार्टमेंट (होटगी रोड), बाहूबली अपार्टमेंट, अशोक चौक, बुधवार पेठ (सम्राट चौक), भवानी पेठ, अवंती नगर (मडकी वस्ती), चिराग रेसिडेन्सी, लक्ष्मी नगर (बाळे), लक्ष्मी पेठ, द्वारका अपार्टमेंट, सात रस्ता, देशमुख कंपाउंड (बुधवार पेठ), गंगा नगर, यशोधरा अपार्टमेंट (रेल्वे लाईन), शेळगी, शास्त्री नगर, उमा नगरी,
तर एमआयडीसी रोड, शेटे नगर (लक्ष्मी पेठ), मोदीखाना, प्रेम नगर, सिध्देश्वर पेठ, रुबी नगर (जुळे सोलापूर), पाच्छा पेठ, रेल्वे लाईन्स्, अभिषेक कॉम्प्लेक्स, जुळे सोलापूर, लक्ष्मीनारायण टॉकिजजवळ, सहारा नगर, मड्डी वस्ती (भवानी पेठ), पूर्व मंगळवार पेठ, सिध्देश्वर पेठ, राऊत वस्ती, कुमठा नाका, अभिषेक कॉम्प्लेक्स व उत्तर सदर बझार येथे आज रुग्ण सापडले आहेत.
Today in Solapur rural area 316 positive and 12 people died in ‘Ya’ village
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज