टीम मंगळवेढा टाईम्स ।
पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यासाठी दडपण येत असेल तर हेल्पलाईनवर तक्रार करा. हेल्पलाईनचा नंबर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
पोलिसांची गस्त पथके वाढविण्यात येणार आहेत. महिलांवर अत्याचार, विनयभंग व अन्य गुन्हे केलेल्या गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.
बदलापूरच्या घटनेनंतर महिलांवरील अत्याचार, विनयभंग व छळाच्या घटनेबाबत राज्यातील पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. गुन्हेगारांना तातडीने शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मागील काही दिवसांपासून रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत. दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर व जामिनावर सुटलेल्या आरोपींवर याचबरोबरच हिस्ट्रीशिर्टस लोकांची तपासणी करून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे.
याबाबत जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांना दक्ष व विशेष लक्ष ठेवण्यासंदर्भात पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी आदेशित केले आहे. गुन्हेगारीवर आळा बसविण्यासाठी नवनवीन अभियान राबविण्यात येणार असल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली.
निर्भया पथक साधतोय तरुणीशी संवाद
ग्रामीण भागात महाविद्यालय, शाळेत जात असलेल्या मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी सातत्याने ग्रामीण पोलिसांचे छेडछाड पथक, निर्भया पथके कार्यरत आहेत. सातत्याने महाविद्यालयांना भेटी देणे,
युवतींशी संवाद साधणे, त्यांच्या तक्रारीचे निराकारण करण्यासाठी वेगाने पाऊले पोलिसांकडून उचलण्यात येतात. शाळा, महाविद्यालय परिसरातील रोडरोमिओवर निर्भया पथकाच्या माध्यमातून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे.
नाकाबंदीतून संशयितांवर वॉच
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी वेळोवेळी नाकाबंदी लावण्याचा निर्णय घेत आहे. आधुनिक युगात गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच वेगवान वाहनांचा वापर करून पसार होत आहेत. यावर आळा घालण्यासाठी रात्रीच्या वेळी नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करून गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात येत आहे.(स्रोत:लोकमत)
कोणत्या नंबरवर कराल तक्रार
११२ हेल्पलाईनवर
■ ऑनलाइन पोर्टलवर
■ ठाण्यात समक्ष येऊन
■ सिटीजन, आपले सरकार
महिला व मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलिसांची रात्रभर गस्ती पथके कार्यरत
वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न असणार आहेत. सध्या ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात येत आहे. याशिवाय पुढील काळात होणारे सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महिला व मुलींना सुरक्षित वाटावे यासाठी पोलिसांची रात्रभर गस्ती पथके कार्यरत असणार आहेत. शिवाय निर्भया पथकेही वाढविण्यात येणार आहेत. अडचणींच्या काळात पोलिसांशी संपर्क साधा, कमी वेळेत आपल्याला ग्रामीण पोलिसांची मदत मिळेल हा माझा विश्वास आहे.-अतुल कुलकर्णी, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज