टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहरात व ग्रामीण भागात कोरोनाने हाहाकार माजवला असून रुग्ण संख्येबरोबर मृत्यूदरही वाढत चालला असून सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.पंढरपूर शहरातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे नाईक आमिन आप्पा मुलाणी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. कोरोनामुळे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची पंढरपूरतील ही पहिलीच घटना आहे.
पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक अमिन आप्पा मुलाणी (वय 50, रा. पोलीस लाईन, पंढरपूर) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आमिन मुलाणी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते.
धक्कादायक : मुंबई-पुण्यानंतर आता पंढरपूरमध्येही कोरोनाने घेतला पोलीसाचा बळी @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @rajeshtope11 @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @PawarSpeakshttps://t.co/i2QWSupZ08 pic.twitter.com/ti2WjeEf9u
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 9, 2020
या दरम्यान रविवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. मुलाणी यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले व 1 मुलगी असा परिवार आहे. solapur rural Coronas first victim in Pandharpur police force
मुलाणी यांच्या मुलीचं नुकतंच लग्न ठरलं होतं आणि काही दिवसांनीच तिचा विवाह होणार होता. परंतु काळाने अचानक मुलाणी यांच्यावर झडप घातली. कुटुंबातील ते एकमेव आधार होते. एकलुती एक लेकीचा विवाह सोहळा न बघताच पोलिस वडिलांचा मृत्यू झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाणी हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते.
पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये एकूण 4 पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी दोघेजण कोरोनामुक्त झाले असून एकाचे असे दुःखद निधन झाले आहे तर एकावर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मिळाली आहे.पंढरपूर शहरातील पोलीसाचा कोरोनामुळे पहिला बळी गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून कायदेशीर मदत मिळणे अपेक्षित आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज