टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर ग्रामीण भागात सध्या कोरोनाने धुमाकूळ घातला असून कोरोना सोलापूरकरांची पाठ काय सोडत नाही दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत असून आज सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 33 नवे रुग्ण आढळून आले असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या रविवारी 850 झाली आहे.
आज 33 नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर माढा तालुक्यातील चिंचगाव येथील 52 वर्षीय महिलेचा व बार्शी येथील मनगिरे मळा 46 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ( Solapur rural corona virus update )
रविवारी ग्रामीण भागातील ( सोलापूर महापालिका क्षेत्र वगळून ) 184 जणांचे स्वब तपासणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी 33 पॉझिटिव्ह आहेत तर 151 निगेटिव्ह आले आहेत. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 850 झाली आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यात 36 जणांना आपले प्राण गमवावे लागले असून आतापर्यंत उपचार घेवून 340 जण घरी परतले आहेत. 474 जणांवर उपचार सुरू आहेत.
आज बोराळे ,ता.मंगळवेढा. जिंती , ता.करमाळा. अनिल नगर ,पंढरपूर भंडारकवठा ,ता.दक्षिण सोलापूर नविन विडीघरकुल ,ता.दक्षिण सोलापूर होटगी ,ता.दक्षिण सोलापूर . वळसंग ,ता.दक्षिण सोलापूर घोडा तांडा ,ता.दक्षिण सोलापूर . कवठाळी ,ता.उत्तर सोलापूर तळे हिप्परगा ,ता.उत्तर सोलापूर . अनगर ,ता.मोहोळ . कुरनुर ,ता . अक्कलकोट, मैंदर्गी ,ता . अक्कलकोट भवानी पेठ ,बार्शी . नाईकवाडी प्लॉट ,बार्शी . सुनिल सावंत सहीस जवळ ,बार्शी . बावी ,ता.बार्शी . वैराग ,ता.बार्शी .पानगाव ,ता.बार्शी असे या भागात नवे रुग्ण आढळून आले आहेत
तालुका निहाय एकूण कोरोनाबाधितांची संख्याः
अक्कलकोट 156 , बार्शी 178 , करमाळा 12 , माढा 26, माळशिरस 11 , मंगळवेढा 5 , मोहोळ 45, उत्तर सोलापूर 91 , पंढरपूर 42 , सांगोला 5, दक्षिण सोलापूर 279. असे एकूण 850 रुग्ण
——————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज