मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग आता एका गावातून दुसऱ्या गावात होऊ लागला आहे.
आज (बुधवारी) उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला तालुक्यातील वाकी(घेरडी) या तालुक्यात नवे 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले.
तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 30 झाली असून बाधितांची संख्या 607 झाली आहे.
आतापर्यंत 270 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सध्या 307 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
बुधवारी बेलाटी,ता.उत्तर सोलापूर . एकरुख , ता.उत्तर सोलापूर.मंद्रुप , ता.दक्षिण सोलापूर . भंडारकवठे,ता.दक्षिण सोलापूर . बक्षीहिप्परगा ,ता.दक्षिण सोलापूर वाकी घेरडी , ता.सांगोला. रिधोरे , ता.माढा . दगड अकोले , ता.माढा. रुक्मिनी नगर , पंढरपूर . नाईकवाडी वस्ती, मोहोळ . आष्टी , ता.मोहोळ .कामती ( बु ) , ता.मोहोळ . विरवडे , ता.मोहोळ . पिंपळगाव ढाळे , ता.बार्शी . वैराग , ता.बार्शी . स्टेशन रोड , अक्कलकोट . बुधवार पेठ , अक्कलकोट या भागात रुग्ण आढळले आहेत.
मयत झालेल्या व्यक्तींची माहिती.
मयत झालेली व्यक्ती पिंपळगाव ( ढाळे ) , ता.बार्शी येथील 65 वर्षाचे पुरुष असून त्यांना दि . 05/07/2020 रोजी सकाळी 11.30 वाजता जगदाळे मामा हॉस्पीटल , बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . 05/07/2020 रोजी रात्री 09.00 वा त्यांचे निधन झाले . त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
मयत झालेली व्यक्ती खासबाग , अक्कलकोट येथील 68 वर्षाचे पुरुष असून त्यांना दि . 02/07/2020 रोजी रात्री 12.26 वाजता सिव्हील हॉस्पीटल , सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . उपचारा दरम्यान दि . 07/07/2020 रोजी रात्री 12.15 वा त्यांचे निधन झाले . त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
मयत झालेली व्यक्ती ग्रामीण पोलिस स्टेशन च्या पाठीमागे , पंढरपूर येथील 80 वर्षाचे पुरुष असून त्यांना दि . 28/06/2020 रोजी रात्री 01.13 वाजता सिव्हील हॉस्पीटल , सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान दि . 07/07/2020 रोजी सायंकाळी 06.45 वा त्यांचे निधन झाले. त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज