टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 620 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर आज कोरोनामुळे 7 जणांचा बळी गेला आहे.
आज 3 हजार 135 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 434 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 620 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 392 पुरुष व 228 महिलांचा समावेश आहे.
आज ‘या’ गावातील 7 जणांचा मृत्यू
पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील 50 वर्षाचे पुरुष, मलिकपेठ (ता. मोहोळ) येथील 75 वर्षांचे पुरुष, केम (ता. करमाळा) येथील 52 वर्षांचे पुरुष, अकलूज (ता. माळशिरस) येथील 75 वर्षाचे पुरुष, रोहिदास चौक पंढरपूर येथील 75 वर्षांचे पुरुष,
तर अक्कलकोट येथील पण 58 वर्षाचे पुरुष, लिंक रोड पंढरपूर येथील 40 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 19 हजार 925 जण कोरोनाबाधित झाले आहेत तर आतापर्यंत 550 जणांचा बळी घेतला आहे.
रुग्णालयात अद्यापही 7 हजार 770 उपचार घेत असून 12 हजार 598 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
Solapur rural Another 620 corona patients Seven killed
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज