टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूरच्या ग्रामीण भागात आज 205 जण पॉझिटिव्ह आले आहेत.त्याचबरोबर कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर आज एकाच दिवशी 394 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.त्याचबरोबर माढा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 34 वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
आज कोरोना चाचणीचे 2 हजार 146 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 हजार 941 अहवाल निगेटिव्ह आले असून 205 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूरच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 27 हजार 998 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 753 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सध्या 4 हजार 506 जणांवर उपचार सुरू आहेत. ग्रामीण भागातील 22 हजार 339 जण आतापर्यंत कोरोना मुक्त झाले आहेत.
आज ‘या’ गावातील तिघांचा मृत्यू
माढा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील 34 वर्षीय महिला, मंगळवेढा तालुक्यातील होनमाने गल्ली येथील 70 वर्षीय पुरुष आणि बार्शी शहरातील शिवाजीनगर येथील 85 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
कोरोना चाचण्यांचे 71 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत. ग्रामीण भागातील 1 लाख 80 हजार 231 कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
सोलापूर शहरात आज 52 पॉझिटिव्ह; 38 वर्षीय महिलेचा मृत्यू
सोलापूर शहरातील रुग्णसंख्या आता आठ हजार 993 झाली असून त्यापैकी सात हजार 683 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक राहिले आहे.
मात्र, मृतांची संख्या आता 498 झाल्याने चिंता कायम आहे. आज भाग्योदय सोसायटीतील 38 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला असून गुरुवारी (ता. 8) रोजी ही महिला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी लक्षणे दिसताच दवाखान्यात दाखल व्हावे, नियमांचे तंतोतंत पालन करुन स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरात आज भारत माता नगर, भवानी पेठ, एसआरपी कॅम्प, विद्या नगरी, इंदिरा नगर, विजय देशमुख नगर, सुशिल नगर, जुना संतोष नगर, द्वारका नगरी (विजयपूर रोड), सिध्देश्वर पेठ, डी-मार्टजवळ, करंजकर सोसायटी, सुरवसे मित्र नगर, सहारा नगर, पोलिस मुख्यालयाजवळ, गांधी नगरजवळ, रामदेव नगराशेजारी, वर्धमान नगर (शेळगी), आंबेडकर नगर,
तर कल्याण नगर, टिळक नगर, म्हाढा कॉलनी, रचना सोसायटी(जुळे सोलापूर), आशा नगर, सुनिल नगर, लक्ष्मी चौक (विडी घरकूल), विश्राम हौसिंग सोसायटी, अंत्रोळीकर नगर भाग- दोन, स्वागत नगर, तोडकर वस्ती (बाळे), दक्षिण सदर बझार, रोहिणी नगर (सैफूल), इंद्रधनू अपार्टमेंट, निरा नगर (बुधवार पेठ), साखर पेठ, उत्तर कसबा, व्यंकटेश अपार्टमेंट (दक्षिण सदर बझार) या भागात नवे रुग्ण आढळले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज