टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 251 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.तर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर आज 222 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज 2 हजार 208 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 957 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 251 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गेल्या अनेक दिवसात पहिल्यांदाच त्यामध्ये केवळ तीन पुरुष तर पाच महिलांचा समावेश आहे. यापूर्वी मृत्यूंमध्ये पुरुषांची संख्या नेहमी जास्त असायची.
मात्र, आज पुरुषांपेक्षा महिलांची संख्या मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये जास्त आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांमध्ये आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या आता 26 हजार 300 एवढी झाली आहे तर आत्तापर्यंत 715 जणांचा बळी कोरोनाने घेतला आहे.
कोरोनाची बाधा झाल्याने अद्यापही 5 हजार 214 जण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. याशिवाय कोरोनामुक्त झाल्याने 20 हजार 371 जणांना घरी सोडण्यात आले आहे.
आज ‘या’ गावातील आठ जणांचा मृत्यू
मंगळवेढा शहरातील माळी गल्ली येथील 68 वर्षाची महिला,तनाळी शेटफळ (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षांचे पुरुष, कुरूल (ता. मोहोळ) येथील 65 वर्षाचे पुरुष, सिंदखेड (ता. अक्कलकोट) येथील 80 वर्षाची महिला, वरवडे (ता. माढा) येथील 60 वर्षाची महिला,
तर अकोलेकाटी (ता. उत्तर सोलापूर) येथील 65 वर्षाची महिला, फळवणी (ता. माळशिरस) येथील वर्षाची महिला, वाखरी (ता. पंढरपूर) येथील 60 वर्षाचे पुरुष यांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापूर शहरात आज 49 जण पॉझिटिव्ह
सोलापूर महापालिका हद्दीत शनिवारी रात्री बारा वाजेपर्यंत कोरोना चाचणीचे 568 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 519 अहवाल निगेटिव्ह आले असून 49 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना मुक्त झालेल्या 47 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना मुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आज नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये अभिमानश्री नगरमधील पंधे अपार्टमेंट, इंद्रधर मारिया चौक, मोदी, वसुंधरा सोसायटी, एसबीआय कॉलनी नंबर 3, कुमठा नाका, कसबा, रामवाडी, कुमठा नाका येथील गुरूनानक नगर, मंत्री चंडक पार्क, होटगी रोडवरील साईनाथ नगर, नवी पेठ, बाळे येथील पाटील नगर, मडकी वस्ती येथील गणेश नगर, पद्मनगर, मुरारजी पेठ, भारती विद्यापीठ, जुळे सोलापुरातील वांकर नगर, जुळे सोलापूर, होटगी रोड,
तर जुळे सोलापुरातील शिवगंगा नगर, मजरेवाडी येथील ब्रह्मदेव नगर, जाई जुई नगर राजस्व नगर, पूर्व मंगळवार पेठ, गांधी नगर येथील वसुंधरा सोसायटी, दमाणी नगर मधील नवनीत अपार्टमेंट, लक्ष्मी पेठ मधील अभिषेक पार्क, मेहतब नगर, शेळगी येथील विद्यानगर, स्वातंत्र्य सैनिक नगर,
तर मंदाकिनी रेसिडेन्सी, विद्यानगर, उत्तर कसबा, मुबीना कॉम्प्लेक्स, अक्कलकोट रोडवरील नितीन नगर, साखर पेठ, पश्चिम मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, स्वामी विवेकानंद नगर याठिकाणी नव्याने कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
Solapur rural 251 new corona positive Eight people from ‘Ya’ village died
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज