समाधान फुगारे । सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या मृत्यूचे सत्र सुरुच असून आज पुन्हा 9 जणांचा बळी गेला आहे तर नव्या 244 कोरोना बाधितांची भर पडली आहे. 31 जण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
( Solapur rural corona news update )
आज एकूण 1 हजार 798 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 1 हजार 554 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 244 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये 152 पुरुष तर 92 महिलांचा समावेश आहे. याशिवाय नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे रुग्णालयात अद्यापही 2 हजार 865 जण उपचार घेत आहेत. कोरोनामुक्त होऊन 5 हजार 31 जण घरी सुखरुप पोचले आहेत.
या गावात आढळले नवीन बाधित
मंगळवेढ्यातील देगाव, मोहोळ मधील बागवान चौक, कोरवली, कन्या प्रशालेजवळ, पेनूर, शेटफळ रोड, सांगोल्यातील आलेगाव, कडलास, कारंडेवाडी, कोळा, महूद, मेथवडे, नाझरे, राजुरी, सरगरवाडी नाझरे, बार्शीतील अलीपूर रोड, भवानी पेठ, चारे, दत्त बोळ, दत्तनगर, देवणे गल्ली, धामणगाव (आ), धर्माधिकारी प्लॉट, गाडेगाव रोड, खामगाव, कोरफळे, लोखंड गल्ली, नाईकवाडी प्लॉट, नवीन चाटे गल्ली, पानगाव, पांगरी, पाटील प्लॉट, सनगर गल्ली, शेळगाव आर, श्रीपत पिंपरी, सोलापूर रोड, वैराग, वाणी प्लॉट, माढा तालुक्यातील बेंबळे, लव्हे, मोडनिंब, सुरली, टेंभुर्णी,
अक्कलकोट मधील मैंदर्गी, चपळगाव, किणी, करमाळ्यातील फंड गल्ली, गुळसडी, केम लव्हे, पांडे, माळशिरस तालुक्यातील अकलूज, बागेचीवाडी, चाकोरे, दहिगाव, खंडाळी, कोंडरपट्टा, माळीनगर, निमगाव, संग्रामनगर, वडगाव, तांबवे, उघडेवाडी, वेळापूर, यशवंतनगर, उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी तांडा, पाकणी, तिऱ्हे, दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरुर फताटेवाडी, हत्तरसंग, मुळेगाव तांडा, टाकळी,
पंढरपूर तालुक्यातील आढीव, भोसे, चळे, चिलाईवाडी, चिंचोली भोसे, दाळे गल्ली, एकनाथ भक्तनिवास, गांधी रोड, गाताडे प्लॉट, इसबावी, जगदंबा वसाहत, जुनी पेठ, कासेगाव, कौठाळी, कुंभार गल्ली, लक्ष्मी टाकळी, महाद्वार रोड, महावीर नगर, मुंढेवाडी, काळा मारुती चौक, विवेक वर्धिनी जवळ, परदेशी नगर, संतपेठ, संत रोहिदास चौक, सरगम चौक, सिद्धेवाडी, स्टेशन रोड, सुस्ते, उपरी, उत्पात गल्ली, वाडीकुरोली याठिकाणी आज नव्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आज ‘या’ भागातील नऊ जणांचा मृत्यू
अलीपूर रोड बार्शी येथील 86 वर्षीय पुरुष, लक्ष्मी टाकळी (ता. पंढरपूर) येथील 58 वर्षाची महिला, चांदगुडे गल्ली करमाळा येथील 90 वर्षाची महिला, हराळवाडी (ता.मोहोळ) येथील 64 वर्षांचे पुरुष, बागवान चौक मोहोळ येथील 45 वर्षाचे पुरुष, कुरुल (ता. मोहोळ) येथील 63 वर्षाचे पुरुष, सुतार नेट बार्शी येथील 59 वर्षाची महिला, स्टेशन रोड पंढरपूर येथील 74 वर्षाची महिला तर अलीपूर रोड बार्शी येथील 75 वर्षाच्या पुरुषाचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत झालेल्यांची संख्या 229 एवढी झाली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 95 6161 7373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज