mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चारित्र्याच्या संशयावरून विवाहित महिलेचा पतीनेच केला खून; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
चारित्र्याच्या संशयावरून विवाहित महिलेचा पतीनेच केला खून; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

टीम मंगळवेढा टाईम्स । 


पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नवऱ्याने पत्नीचा गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील माढ्यात घडली आहे. एवढंच नाहीतर पत्नी प्लॉट नावावर करत नाही म्हणून पतीने हे कृत्य केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.


प्लॉट नावावर करुन देण्याच्या मागणीसह चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी माढा पोलिसात नवरा, सासू आणि सासरा अशा तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना माढ्यातील शुक्रवार पेठेत शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. सना इरफान मोमीन (वय २७) असे मयताचे नाव असून इरफान रजाक मोमीन, रजाक मकबूल मोमीन, आसिया रजाक मोमीन अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, मयत सना (व २७ रा.मोमिन गल्ली, शुक्रवार पेठ. माढा) हिचे लग्न इरफान रजाक मोमीन याच्या बरोबर झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यापासून तिला सासरी नवरा इरफान रजाक मोमीन, सासरा रजाक मकबूल मोमिन, सासू आशिया रजाक मोमीन यांनी दोन महिने व्यवस्थित नांदून घेतले. त्यानंतर, तुझ्या आई-वडिलांनी लग्नामध्ये आम्हाला काहीही दिले नाही.


मानपान केला नाही म्हणत तिचा छळ सुरू केला. तर उस्मानाबाद येथील प्लॉट आमच्या नावावर कर असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी मारहाण केली. त्यानंतर सतत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू होता. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तिचा नवरा इरफान रजाक मोमिन याने सनाचा गळा दाबून जीवे मारले.

अशी फिर्याद मयताचे वडील महंमदमुसा गुलामदस्तगीर अन्सारी (व ५२. रा. शालिमार कॉलनी एम.आय. डि. सी. उस्मानाबाद) यांनी दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे हे करत आहेत.

Solapur Murder of a married woman by her husband on suspicion of character

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: CrimeLatest NewsMaharashtra MazaSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचे झाले कोरोनामुळे निधन; दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला शोक

राष्ट्रवादीच्या 'या' नेत्याचे झाले कोरोनामुळे निधन; दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला शोक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द झाल्यानं सोलापूर विमानतळाचे उद्घाटन लांबले; मुख्यमंत्र्यांचा दौरा सहाव्यांदा पुढे ढकलला, आता ‘या’ तारखेला नियोजन

सोलापूरकरांची प्रतीक्षा संपली! आता हैदराबादसाठीही उड्डाण; बुकिंगला सुरुवात, ‘या’ तारखेला होणार पहिले उड्डाण

April 5, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

नो पेमेंट-नो सर्व्हिस’! मंगळवेढा पालिकेचा थकबाकीदारांना दणका; अवघ्या ३ दिवसांत ‘इतक्या’ लाखांची वसुली; नळतोडणीसह धडक कारवाई

April 5, 2026
मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

मंगळवेढ्यात गॅस टॅंकरचा ‘धोकादायक’ काळाबाजार; रात्री सुरू असतो जीवघेणा खेळ; अवैध गॅस रिफिलिंगमुळे मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीती

April 4, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांचा सुळसुळाट; व्यापाऱ्याला लुटले, १.४५ लाखांची रोकड लंपास; ​अशी केली फसवणूक

April 5, 2026
ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

ॲक्शन मोड! आमदार समाधान आवताडे यांची ‘या’ हॉस्पिटलला ‘सरप्राईज व्हिजिट’; रुग्णालयातील सुविधांची केली थेट तपासणी

April 4, 2026

खाजगी सावकारकीचा कहर! सहा वर्षांत १० हजारांचे झाले सात लाख; राहते घर नावावर करूनही मुद्दल व व्याजासाठी दमदाटी व शिवीगाळ

April 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा