टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व तालुक्यात कोरोनाने थैमान सुरु असून आज पुन्हा 4 नव्या रुग्णांची भर पडली आहे.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 192 वर गेली आहे.
आज दि.8 ऑगस्ट रोजी स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 46 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
आज घेतलेल्या 46 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 2 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 44 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदर नागरीक हे खोमनाळ -1 , मंगळवेढा -1 , येथील आहेत. तर सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे 2 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण हे मंगळवेढा -1 , डोंगरगांव -1 येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 192
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 98 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 92 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज