
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोना पाठ सोडता सोडेना आज पुन्हा 11 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 188 वर गेली आहे.
आज दि.7 ऑगस्ट रोजी स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.तसेच आज 267 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहे. 267 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी 10 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आणि 257 जणांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सदर नागरीक हुलजंती 3 , दामाजीनगर 6 , मंगळवेढा -1 येथील आहेत. व सोलापूर येथे पाठविणेत स्वब ( RT – PCR ) चे 1 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्ण दामाजीनगर येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 188
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 97 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 89 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












