मंगळवेढा टाईम्स । कोरोनाबाधित व संशयितांच्या मृत्यूचे सत्र मंगळवेढा तालुक्यात सुरूच असून , आज शहरातील नागणेवाडी येथील एक महिला उपचारादरम्यान मयत झाली आहे. तसेच आज आणखी तालुक्यातील 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 680 पर्यंत पोहोचला आहे.
मंगळवेढा तालुक्यात कोरोनाबाधित सापडण्याचे व बाधित आणि संशयितांच्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आजही बाधितांबरोबर मृतांचीही संख्या वाढली.तालुक्यातील एकूण मृतांची संख्या 16 झाली आहे.
आज दि.8 सप्टेंबर रोजी नागरिकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत. तसेच आज 709 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.
पाहिजेत
मंगळवेढा शहरात नव्याने सुरू होणाऱ्या मेडिकल स्टोअरसाठी बी’ किंव्हा ‘डी’ फार्मसी झालेल्या अनुभवी मुला मुलींची अर्जंट भरती होणार आहे. संपर्क : 7322020202
वरील 709 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 41 आणि निगेटिव्ह 668 जणांचे अहवाल आलेले आहेत.सदरचे नागरिक हे मंगळवेढा शहर 17 , चोखामेळानगर 5 , दामाजीनगर 2 , जुनोनी 1 , भोसे 10 , गोणेवाडी 2 , कचरेवाडी 2 , तळसंगी 1 , फटेवाडी 1 येथील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 4 पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. सदरचे नागरिक हे हे मंगळवेढा शहर 2 , सलगर बु .2 येथील रूग्णांच्या निकटतम संपर्कातील आहेत.
मंगळवेढा तालुक्यात आतापर्यंत 680 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 346 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आता पर्यंत 318 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज