घाबरू नका! ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील व्यक्ती विलगीकरण कक्षात
मंगळवेढा येथील ‘त्या’ हॉस्पिटलची यादी सध्या व्हाट्सअप्पवर व्हायरल होत आहे.दि.1 जुलै ते दि.9 जुलै पर्यंत उपचार घेतलेल्या 500 नागरिकांना प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून होम कोरंटाईन होण्याबाबत सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे उपचार घेतलेल्या कोणत्याही नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथील एका महीलेचा शनिवार दि.11 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. महिलेचे निकट संपर्कातील कुटुंबातील 9 आणि हॉस्पीटल मधील 30 असे 39 व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणेत आले असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
सदर महीलेने मंगळवेढा येथील ज्या हॉस्पीटल उपचार घेतला आहे तेथे दि.1 जुलै पासुन ते दि.9 जुलै पर्यंत उपचारासाठी आलेल्या सर्व सुमारे 500 रुग्णांना घरात विलगीकरण कक्षामध्ये रहाण्याच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत.
मंगळवेढा शहरामध्ये कोरोना या आजाराचा प्रार्दुभाव वाढु नये या करीता मंगळवेढा नगरपरिषद हद्द परीसर , मंगळवेढा शहरालगत ग्रामीण परीसर आणि शहरालगत असलेल्या दोन ग्रामपंचायती श्री.संत दामाजीनगर व श्री. संत चोखामेळानगर ग्रामपंचायत हद्द परीसर व त्याच्या आजुबाजुच्या एक किलो मीटर पर्यंतचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र ( Containment Zone ) म्हणुन घोषीत करणेत आलेला आहे.
तसेच सदर प्रतिबंधीत क्षेत्रापासुन तीन कि.मी. पर्यंतचे परिसर बफर झोन म्हणुन अलहीदा घोषीत करणेत आलेला आहे. सदर प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये ( Containment Zone ) अत्यावश्यक सेवा वगळुन इतर सर्व सेवा आणि आस्थापना पुढील आदेश होईपर्यत बंद करणेत आलेल्या आहेत.
आरोग्य विभागा मार्फत सर्वेक्षणाचे कामकाज सुरु असुन आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज