टीम मंगळवेढा टाईम्स । घरातील व शेजारच्या दुकानातील लहान मोठया चोर्या केल्याच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलाचा मंगळवेढा शहरातील शनिवार पेठेत खून करण्यात आला असून या प्रकरणी काका लखन विलास जाधव (वय 35) याच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण सुरेश विटकर (वय 13रा.दुधनी ता.अक्कलकोट) असे त्या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. ( Solapur mangalwedha city Murder of a minor for theft )
दि. 2 जुलै रोजी रात्री 10.00 च्या दरम्यान यातील आरोपी लखन जाधव याने मयत अल्पवयीन मुलगा लक्ष्मण हा घरातील आणि शेजारच्या दुकानातील लहान मोठया चोर्या करतो म्हणून शनिवार पेठेतील जयभवानी कॉलनीत राहते घरी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खून केला.व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाची निर्जन ठिकाणी खड्डा खोदून त्यामध्ये पुरुन त्याची विल्हेवाट लावली.
तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगा हरवल्याची खोटी तक्रार देण्यास मयत मुलाची आजी श्रीमती भंगारेखा चंद्रकांत माळेकर (वय 63) हिस प्रवृत्त केले असल्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय पुजारी करीत आहेत.
दरम्यान रात्री उशीरापर्यंत डी . वाय. एस. पी. दत्तात्रय पाटील, सहाय्यक पोलिस निरिक्षक अमोल बामणे,तपासिक अंमलदार दत्तात्रय पुजारी,उपनिरिक्षक सचिन खटके,नायब तहसीलदार सुधाकर मागाडे,आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय शिंदे,पोलिस हवालदार घोळसगावकर , पोलिस कॉन्स्टेबल रफिक तांबोळी, पो.कॉ.सचिन दरदरे,पो.ना.तुकाराम कोळी,विक्रमसिंग राठोड,सुनिल मोरे,पोलिस शिपाई अनिल दाते,खुपसंगीचे कोतवाल नितीन माळी आदीनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देवून पुरलेेले प्रेत बाहेर काढले.प्रेत कुजलेल्या स्थितीत असल्याने जागेवरच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज