टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथील एका व्यक्तीचा दि.9 जुलै रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर व्यक्तीचे निकट संपर्कात आलेल्या ( high risk contacts ) 39 व्यक्तींचे कोरोना चाचणी कामी स्वब कोविड केअर सेंटर मंगळवेढा येथे दि.11 जुलै रोजी घेणेत आलेले होते. त्यापेकी 37 जणांचे कोरोना चाचणी अहवाल आज प्राप्त झालेले असुन सर्व 37 अहवाल निगेटव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
वैदयकीय अधिकारी यांचे सल्यानुसार त्यांना पुढील काळात घरी विलगीकरणकक्षात ठवेणेची कार्यवाही करणेत येणार आहे. उर्वरीत दोन अहवाल प्रतिक्षत आहेत. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे.
त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
मोठे टेन्शन टळले…..
मंगळवेढा येथील त्या हॉस्पिटलमधील डाॅक्टरसह कर्मचारी तसेच त्या व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तीसह 37 जणांचा रिपोर्ट आले निगेटिव्ह
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज