
मंगळवेढा । प्रतिनिधी मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता आलेख आता चिंचेता भर घालणारा ठरत आहे. कारण की, काही दिवसांपासून कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज पुन्हा 9 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 458 वर गेली आहे.
मात्र , तरी देखील बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी कायम होत आहे.त्यात आता काही ठिकाणी पान स्टॉल , हॉटेलही खुले झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा विळखा कमी होण्याची चिन्हे नाहीत. आज कोरोनामुक्त होऊन 32 जण घरी गेले आहेत.
आज दि.29 ऑगस्ट रोजी 107 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 144 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 144 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पैकी पॉझिटिव्ह 9 आणि निगेटिव्ह 135 जणांचे अहवाल आलेले आहेत.
सदरचे नागरिक हे मंगळवेढा 1 , डिकसळ 5 , कात्राळ 1 , दामाजीनगर 1 आणि आसबेवाडी 1 येथील आहेत. सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहीत.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 458 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 318 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 131 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, 32 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने मोठा दिलासा मिळाला असला तरी दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णांची संख्या ही चिंताजनक बाब आहे. नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













