टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील बोराळे या गावातील एका व्यक्तीची दि.8 जुलै रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्याच्या संपर्कातील 8 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्या असल्याची माहिती प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.
बोराळे येथे दि.8 जुलै रोजी एक व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सदर व्यक्तीचे निकट संपर्कातील 10 व्यक्तीचे ( कुटुबांतील चार व्यक्तीचे सोलापूर येथे आणि बोरोळे येथील 6 जणांचे कोवीड केअर सेंटर मंगळवेढा येथे ) कोरोना चाचणी अहवाल घेणेत आलेले होते.
बारोळे येथील 6 जणांचे कोवीड केअर सेंटर मंगळवेढा येथे घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी नमुना अहवाल आज दि.12 जुलै रोजी प्राप्त झाले असुन ते सहा अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. सदर व्यक्तीचे कुटुंबातील सोलापूर येथे घेतलेल्या 4 कोरोनाचाचणी अहवाला पैकी 2 अहवाल पॉझिटिव्ह आणि कुटुंबातील दोन निगेटिव्ह आलेचे शनिवारी जाहीर करणेत आले आहे.
बोराळे हे गाव दि.8 जुलै पासुन प्रतिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करणेत आलेले आहे. तसेच सदर गावापासुन 3 किमी परीसर बफर झोन जाहीर करणेत आलेला आहे.
बोराळे येथे आरोग्य विभाग मार्फत सर्वेक्षणाचे कामकाज सुरु असुन आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे नागरीकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज