टीम मंगळवेढा टाईम्स । कुर्डुवाडी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरातील सर्व व्यापारी व दुकानातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे, जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत नगरपरिषदेने पत्रक जाहीर केले आहे.
कुर्डुवाडी येथील माढा रोडवरील पंचायत समितीच्या विठ्ठलराव शिंदे सभागृहामध्ये आज ९ सप्टेंबरपासून सकाळी नऊ वाजल्यापासून संपेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोरोना चाचणी करून घ्यावी. त्याचे प्रमाणपत्र दुकानात दिसेल असे लावावे.
ज्या व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घेतली नाही. अशाचे दुकान उघडू दिले जाणार नाही. असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
चाचणी न केलेल्या व्यापाऱ्यांना दुकान उघडता येणार नाही
कुर्डुवाडी शहरामध्ये बुधवार ते रविवार असा पाच दिवसांत जनता कफ्यूं आहे.या दरम्यान सर्वव्यापारी व दुकानातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. अन्यथा सोमवारी चाचणी न केलेल्या व्यापाऱ्यांना दुकान उघडता येणार नाही.- तुकाराम पायगण,आरोग्य निरीक्षक , नगरपालिका, कुर्डुवाडी.
व्यापारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यामुळे सुरक्षितता वाढेल
कुर्डुवाडी शहरातील कोरोनाचच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता चाचणी घेण्याचा नगरपालिकेने घेतलेला निर्णय योग्य आहे. व्यापारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केल्यामुळे अधिक सुरक्षितता वाढेल. इतरांना होणारा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. – विकास संचेती,अध्यक्ष,कापड असोसिएशन, कुर्डुवाडी.
Kurduwadi city Test the corona, otherwise the shops will not open
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज