मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार रविवारी जिल्हाभरातील 3 लाख 39 हजार 357 बालकांना पल्स पोलिओचे लसीकरण करण्यात आले.
उद्दिष्टापैकी 92 टक्के लसीकरण करण्यात आरोग्य खात्याला यश आले. जि.प. अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातून, तर उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या हस्ते मंगळवेढा तालुक्यातून बालकांना पोलिओ डोस देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हाभरातील 4 लाख 58 हजार 4 बालकांना पोलिओ डोस पाजण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी आरोग्य विभागाची यंत्रणेकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती.
सन 2012 पासून पोलिओचा एकही रुग्ण नाही.मात्र तरीही पोलिओचा रुग्ण निर्माण होऊ नये, यासाठी वर्षातून एकदा शासनाच्या आदेशानुसार आता 19 जानेवारी रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात आली.
पोलिओ लसीकरणासाठी ग्रामीण, नागरी व महापालिका क्षेत्रात एकूण 2 हजार 779 लसीकरण केंद्र तैनात करण्यात आले होते. यासाठी एकूण 7 हजार 301 मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. यात पर्यवेक्षक म्हणून 559, 153 वैद्यकीय अधिकारी, 11 आरोग्य पर्यवेक्षक, 116 महिला आरोग्य सहायक, 146 पुरुष आरोग्य सहायक, 303 आरोग्य सेवक, 655 आरोग्य सेविका, 4 हजार 186 अंगणवाडी सेविका, 2 हजार 763 आशा कार्यकर्ती यांची नेमणूक करण्यात आली होती.
रविवारच्या मोहिमेत जे बालक लसीकरणापासून वंचित असतील, अशा बालकांचा शोध घेऊन पुन्हा 21 जानेवारी रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार यांनी सांगितले. महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरात पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
या मोहिमेसाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर गायकवाड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक एस.के. पाटील, प्रशासन अधिकारी अरिफ सय्यद, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित्रा तांबारे, साथरोग तज्ज्ञ आरोग्य अधिकारी डॉ. मदन देशपांडे, आयुष अधिकारी डॉ. विलास सरवदे, जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख, अशोक गाडीलकर, विजयमाला बेले आदींनी परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज