टीम मंगळवेढा टाइम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापुरला पळवल्याचा आरोप सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यावर गेली दोन दिवस केला जातोय. यावर आज सोलापूरच्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री भरणे आक्रमक झाले.
या पाण्यावरून राजकारण केलं जातंय. हे मोठं षडयंत्र आहे.मात्र सोलापूरचे एक थेंब पाणी जरी कमी झाल्याचे सिद्ध झाल्यास मंत्रीपद,आमदारकी सोडा राजकारणातून संन्यास घेईन असे थेट आव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय.
काही दिवसांपूर्वी उजणीतून इंदापूरला ५ टीएमसी पाणी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पळवल्याचा आरोप केला जातोय.
यावर भावूक होऊन भरणे यांनी आपली भूमिका मांडली. इंदापूर माझा तालुका आहे. मात्र मला भाकरी मिळावी म्हणून दुसऱ्याची भाकरी पाळवण्याचे माझे संस्कार नाहीत. त्यामुळे सोलापूरकरांनी काळजी करू नये असे आश्वासन त्यांनी दिल.
सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. सर्वांनी सहकार्य करावे. अडचणीचा काळ आहे.
अशावेळी राजकारण नको मिळून कोरोनावर मात करूया. ऑक्सिजन, लसीकरण , रेमाडीसीवीर इंजेक्शन साठी आम्ही प्रयत्न करतोय.
ऑक्सिजन साठी तर उस्मानाबाद आणि सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांप्रमाणे भांडण झाले. प्रशासकीय अधिकारी जीव तोडून काम करताहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करा असे आवाहन त्यांनी केलं.
उजनीचे पाणी पळविल्याचे सिध्द झाल्यास राजीनामा देईल
उजनी धरणातील पाणी इंदापूरला पळविल्याचा आरोप पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर करण्यात येत आहे. मात्र, उजनी धरणातील आरक्षित पाण्यातून एक थेंब जरी मी पळविल्याचे सिध्द झाल्यास, मंत्रीपदासह आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान त्यांनी दिले आहे.
उजनीतील पाणी सोलापुरातील शेतकऱ्यांना, सोलापूर शहरासाठी पुरेशा प्रमाणात मिळत नाही. तशातच इंदापूरला पाणी पळविल्याने नाराजीत भर पडली आहे. सत्ताधारी पक्षातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह विरोधक आता म्हणत आहेत की, पालकमंत्री नुसतेच गोड बोलतात, आश्वासन देतात, परंतु कोरोना काळात त्यांनी पालकमंत्री म्हणून जिल्ह्यासाठी काहीच केले नाही, असा आरोपही त्यांच्यावर केला जात आहे.
सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीनंतर आचारसंहिता शिथिल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली. त्यावेळी आपण आचारसंहितेमुळे जिल्ह्याकडे लक्ष देऊ शकलो नसल्याची दिलगिरी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
मात्र, इंदापूरसाठी उजनीतून पाणी पळविल्याचा आरोप आणि कोरोना काळात हॉस्पिटलमध्ये बेड नाहीत, ऑक्सिजन नाही, रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळत नाहीत. लसदेखील पुरेशा प्रमाणात मिळत नाही.
या पार्श्वभूमीवर पाकलमंत्र्यांवर सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांसह विरोधकांनी आरोप करीत पालकमंत्री बदल्याचीच मागणी केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांना पालकमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा पोट निवडणुकीच्या प्रचारात गुंग असलेल्या पालकमंत्र्यांना कोरोना आढावा बैठकीसह ठोस, धोरणात्मक निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाने नुकतीच परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस, बार्शी, मोहोळ या तालुक्यांची आढावा बैठक घेतली.
मागील तीन दिवसांपासून पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्याबद्दल नाराजी प्रचंड वाढली असून कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी त्यांच्यावर शनिवारी टीका केली.
तर आज सोलापुरातील नियोजन भवनात आयोजित बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांना बैठकीला जाताना पोलिसांनी अडविले. त्यांनी वरिष्ठांना कॉल केल्यानंतर त्यांना प्रवेश देण्यात आला. तत्पूर्वी, महापालिकेचे सभागृह नेते श्रीनिवास करली यांनाही अडविण्यात आले.
माजी सभागृह नेत्यांना प्रवेश दिलाच नाही. या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीच बदला, असा सूर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विरोधकांमधून ऐकायला मिळत आहे. दरम्यान, शनिवारी बार्शी व अन्य तालुक्यातील लोकांनी पालकमंत्र्यांना विरोध करून काळे झेंडे दाखविले होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज