टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज 434 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून दिलासादायक बाब म्हणजे आज केवळ पाच जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. त्यामध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
आज एकूण 2 हजार 917 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 483 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह तर 434 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्यांची संख्या आता 23 हजाराच्या पुढे गेले असून आज आलेल्या अहवालानुसार एकूण कोरोनाबाधितांची संख्या 23 हजार 104 एवढी झाली आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत कोरोनामुळे 633 जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.
कोरोना झाल्यामुळे अद्यापही आठ हजार 257 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर कोरोनामुक्त होऊन 15 हजार 244 जण आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.
आज ‘या’ गावातील 5 जणांचा मृत्यू
बार्शी तालुक्यातील झाडी 75 वर्षाचे पुरुष, पोफळज (ता. करमाळा) येथील 55 वर्षाची महिला, कानड गल्ली करमाळा येथील 36 वर्षाचे पुरुष, साठेनगर मोहोळ येथील 80 वर्षाचे पुरुष, भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील 61 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 633 एवढी झाले आहे.
सोलापूर शहरात आज 68 पॉझिटिव्ह
सोलापूर शहरातील आठ हजार 185 व्यक्तींना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात चार हजार 805 पुरुष आणि तीन हजार 380 महिलांचा समावेश आहे. दुसरीकडे मृतांमध्ये 314 पुरुष आणि 152 महिला आहेत.
रुग्ण आणि मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचाच सर्वाधिक समावेश आहे. आज शहरात 68 जण पॉझिटिव्ह सापडले असून त्यात 52 पुरुष तर 16 महिला असून शारदा नगरातील 66 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.
मुकूंद नगर (न्यू बुधवार पेठ), होटगी नाका, दक्षिण कसबा, रोहिणी नगर, आनंद नगर, विजयालक्ष्मी नगर, जयकुमार नगर (विजयपूर रोड), लोकमान्य हौसिंग सोसायटी (कुमठा नाका), बुधवार पेठ, भवानी पेठ, सहारा नगर, अंत्रोळीकर नगर, अशोक नगर (होटगी रोड),
तर रेल्वे लाईन, थोबडे वस्ती (देगाव), जयलक्ष्मी नगर, विद्या नगर (शेळगी), इंडियन मॉडेल स्कूलजवळ, सुशिल नगर, दत्त नगर, श्रीकांत नगर, दोंडे नगर, भिमा नगर (जुळे सोलापूर), भिम नगर (मजरेवाडी), सनसिटी, गवळी वस्ती (दमाणी नगर), कमला नगर, भारत्न इंदिरा नगर, गुरुवार पेठ,
तर सिध्देश्वर पेठ, जम्मा वस्ती (संतोष नगर), हिरेहब्बू कॉम्प्लेक्स (उत्तर कसबा), ब्रह्मदेव नगर (होटगी रोड), गणेश नगर, अंबिका नगर (बाळे), राघवेंद्र नगर, न्यू पाच्छा पेठ, सवेरा नगर (सैफूल), बंजारा सोसायटी, विजापूर नाका, पी.डब्ल्यूडी क्वॉर्टर,
आणि मुरारजी पेठ, मंगल रेसिडेन्सी (आसरा चौक), लिमयेवाडी, गायत्री नगर (वसंत विहार), भारत नगर (विडी घरकूल), भाग्योदय हौसिंग सोसायटी, नम्रता हौसिंग सोसायटी या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली.sakal
In rural Solapur district today, 434 positive and five victims,68 positive in Solapur city today
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज