टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज वाटप आता २१०० कोटींवरून ३४०० कोटी रुपयांवर पोहोचले असून, या आर्थिक वर्षात पगारदार आणि व्यापाऱ्यांसाठी कर्ज वाटपाच्या नवीन योजना आणल्या आहेत.
जिल्हा बँकेसाठी २०१८ हे वर्ष कसरतीचे ठरले होते. शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी एक रुपयाही नसलेल्या बँकेचा कारभार प्रशासकाच्या ताब्यात देण्यात आला.
त्यानंतर ठेवीत मोठी वाढ झाल्याने कर्ज देणेही शक्य झाले. कर्जाची परतफेड करु शकणाऱ्या घटकांना समोर ठेवून नवीन कर्ज वाटप योजना निश्चित करण्यात आल्या;
मात्र शेतकऱ्यांना दोन वेळा कर्जमाफी करूनही त्यांची थकबाकी वाढतच आहे. कर्ज भरले म्हणून नव्याने कर्ज घेतलेले शेतकरी पुन्हा कर्ज थकवत आहेत. मागील तीन वर्षांत थकबाकी वाढलेली आहे.(स्रोत:लोकमत)
शेतकऱ्यांसाठी मध्यम मुदत ..
अडचणीत असल्याने ठप्प झालेले मध्यम मुदत कर्ज वाटप पुन्हा सुरू करण्यात येणार असून, ३० जूनपासून हे कर्ज वाटप सुरू होईल असे सहायक सरव्यवस्थापक रावसाहेब जाधव यांनी सांगितले.
मालमत्तेवर कर्ज
■ लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी ही नवीन कर्ज योजना बँक राबविणार असून, ४० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. पगारदारांसाठी राबविलेली नंदिनी गृह कर्ज’ ही जुनी व बंद असलेली योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहे.
बँकेमार्फत नियमित पगार होणारे नोकरदार, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना नवीन घर बांधणी व खरेदीसाठी ३० लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे.
■ लहान व्यापारी व उद्योजकांसाठी मध्यम मुदत ३५ लाखांपर्यंत कर्ज दिले जाणार आहे. याच घटकांना एक लाखापर्यंत कॅश क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे.
■ व्यापारी , उद्योजक , व्यावसायिक यांच्यासाठी नवीन चारचाकी वाहन खरेदीसाठी ३० लाखांपर्यंत, तर पगारदार नोकरांसाठी २० लाखांपर्यंत कर्ज वाटप केले जाणार आहे.
■ पेट्रोल , डिझेल पंपासाठी कॅश क्रेडिट मध्यम मुदत कर्ज ५० लाखांपर्यंत दिले जाणार आहे, तर सोने तारण कर्जावरील व्याज दर कमी करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज