टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या जिल्ह्यात दोन वाळू डेपो सुरू असून, आणखी तीन डेपो लवकरच सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तीन डेपो सुरू होतील.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात आणखी १३ वाळूघाटांचा लिलाव होणार असून, हा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. पर्यावरण विभागाची मंजुरी मिळताच या १३ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.
२०२३ व २०२४ मध्ये एकूण चार ठिकाणांचा लिलाव झाला. नवीन धोरणानुसार गाळमिश्रित वाळू डेपोंना मंजुरी मिळाली.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मंद्रुप), पंढरपूर तालुक्यातील देगाव, मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर तसेच मंगळवेढा तालुक्यातील आरळी या ठिकाणांचा लिलाव झाला.
यापैकी औज आणि देगाव हे दोन वाळू डेपो सुरू असून, घोडेश्वर व आरळी हे दोन डेपो पावसाळा संपल्यानंतर चालू करण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अहवाल येणार आहे. हा अहवाल प्रलंबित आहे.
२०२४-२५ या नवीन वर्षाकरिता तीन वाळूघाटांचा लिलाव प्रस्तावित आहे. याची ई-टेंडर प्रक्रिया कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मंजुरीसाठी त्यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहेत. यात मंगळवेढा तालुक्यातील बठाण, उचेठाण तसेच पंढरपूर तालुक्यातील तारापूर या ठिकाणांचा समावेश आहे.
१ हजार ९३ ब्रास वाळूसाठा शिल्लक
३० नोव्हेंबरअखेर जिल्ह्यात एकूण ९ वाळूघाटांची संख्या निश्चित करण्यात आली असून, याठिकाणी एकूण १२ हजार ८०२ ब्रास वाळूसाठा होता. आतापर्यंत १८२३ नागरिकांनी ११ हजार ३९३ ब्रास साठ्याची नोंदणी केली आहे. यापैकी १० हजार ३१० ब्रास वाळू वितरित झाली आहे. सध्या १ हजार ९३ ब्रास वाळूसाठा शिल्लक आहे, अशी माहिती अमृत नाटेकर यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज