टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तीस दिवसांत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सहा डिसेंबरपर्यंत उमेदवारांना विहित नमुन्यात निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.
27 ग्रामपंचायतींसाठी पाच नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक झाली. सरपंचपदाच्या उमेदवारांना ५० हजार ते १ लाख ७५ हजार रुपयांपर्यंत तर सदस्यपदांच्या उमेदवारांना २५ हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च करण्यास मुभा दिली होती.
उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दिवसापासून निवडणूक खर्च गृहीत धरला जातो. त्यामुळे सहा डिसेंबरपर्यंत उमेदवारांना विहित नमुन्यात निवडणुकीचा एकूण खर्च सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.
त्यामुळे विजयी आणि पराभूत उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर करावा, असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.
… तर सरपंचपद व सदस्यत्व रद्द
विजयी उमेदवाराने ६ डिसेंबरपर्यंत निवडणुकीचा एकूण खर्च सादर न केल्यास त्यांचे पद रद्द केले जाते. निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना देखील निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक आहे.
अशा उमेदवारांनी खर्च सादर करण्याकडे दुर्लक्ष केल्यास संबंधित उमेदवारांना आगामी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जाते. यापूर्वी निवडणूक विभागाने काही उमेदवारांना अपात्र ठरविले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज