टीम मंगळवेढा टाइम्स ।
सोलापूर येथील वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या पत्नी सराफ बाजारात गंठण गाठण्यासाठी गेल्या असता चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील अडीच लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या.
ही घटना सराफ कट्टा येथील आपटे यांच्या सोने विभाग व चांदी विभाग दुकानाजवळ घडली.याबाबत कविता आनंद चंदनशिवे (वय 34, रा. मिलिंद नगर, पी. बी. चौक, बुधवार पेठ, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायंकाळी कविता चंदनशिवे व त्यांची मुलगी हे दोघे सराफ कट्टा येथील आपटे यांचे चांदी विभाग व सोने विभाग येथे खरेदीसाठी गेल्या होत्या.
दुकानात पैंजण व ठुशीची चौकशी करून दुकानाच्या दरवाज्याजवळ गळ्यातील गंठण गाठवीत होत्या. त्यावेळी चंदनशिवे यांच्या हातातील प्लास्टिकच्या पिशवीत पाऊचमध्ये 66.4 ग्रॅम वजनाच्या 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या नक्षीच्या बांगड्या ठेवल्या होत्या.
त्या बांगड्या चोरट्याने त्यांची नजर चुकवून पिशवी मधोमध कापून चोरून नेल्या. म्हणून जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक धायगुडे पुढील तपास करीत आहेत.(source : sakal)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज