mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उमेदवारांनो! सरपंचपद किंवा सदस्यासाठी सभा, बैठका, बॅनरबाजी करताय? यांची परवानगी आवश्यक; जाणून घ्या अटी अन् नियम

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 13, 2022
in सोलापूर
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात पंचायत समिती व झेडपीची लिटमस टेस्ट; जनतेचा राजकीय कल स्पष्ट होणार?

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. सरपंचपद किंवा सदस्य होण्यासाठी निवडणूक शाखेकडून विविध नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. एवढेच नव्हे तर पोलिस प्रशासनाकडूनही निवडणूक लढविणाऱ्यांना उमेदवारांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत.

या नियम व अटीचे पालन न केल्यास किंवा पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास संबंधितांवर अपात्रता, दंडात्मक अथवा गुन्हेही दाखल होणार आहेत.

त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढविणारे सरपंच व सदस्य पदांच्या उमेदवारांनी सर्व नियम, अटीचे पालन करणे अनिवार्य असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले आहे.

सध्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचार सुरू झाला आहे. ज्या ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत, तेथे प्रचाराचा शुभारंभाचे कार्यक्रम होत आहेत. उमेदवार हे घरभेटीवर जास्त जोर देत आहे.

शिवाय प्रचारासाठी सोशल मीडियाचाही वापर वेगाने वाढला आहे. गावपातळीवर पक्षीयपेक्षा गावपातळीवरील राजकारण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडी व विकास पॅनेल निर्माण केले जातात..

जिल्ह्यात १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका….

सोलापूर जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. अर्ज दाखल करणे, छाननी, अर्ज माघार घेणे ही प्रक्रिया संपली असून प्रत्यक्ष प्रचार सुरु झाला आहे. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती या ९, ११, १७ सदस्य संख्या असलेल्या आहेत. शिवाय लोकनियुक्त सरपंचपदासाठी स्वतंत्र उमेदवार आहे. १८ डिसेंबरला मतदान असून २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बँक खाते…..

ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र बैंक खाते काढणे बंधनकारक आहे. शिवाय रोजच्या रोज खर्चाचा हिशोब निवडणूक शाखेकडे जमा करणे बंधनकारक आहे. अन्यथा निवडणूक शाखेच्या कारवाईला सामोरे जावे लागते. सरपंचपद व उमेदवारांना खर्चाची मर्यादा निवडणूक शाखेने घालून दिली आहे.

निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार

ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधितावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, मतदान, मतमोजणी होईपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. मतदानासाठी कोणत्याही प्रकारचे आमिष दाखविल्यास संबधितावर गुन्हे दाखल करण्यात येणार असे पोलीस प्रशिक्षण कडून सांगण्यात आले.

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच व सदस्य पदांच्या उमेदवारांना खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. शिवाय प्रचार मतदान व मतमोजणी कालावधीत तहसील, पोलिस व निवडणूक शाखेकडून विविध नियम व अटीचे पालन केले जाईल असे लिहून घेण्यात आले आहे. कोणताही नियम मोडल्यास आमच्यावर कारवाई होणार आहे याची आम्हाला जाणीव आहे. -ग्रामपंचायत उमेदवार

सभा, बैठका, बॅनरसाठी परवानगी आवश्यक

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभा, बॅनर, कॉर्नर बैठका घेण्यात येतात. मात्र या सर्व बैठकांना तहसील, पोलीस व ग्रामसेवकांची परवानगी घेणे आवश्यक आहे. शिवाय नियम व अटीचा भंग झाल्यास कारवाई होईल. (स्रोत:लोकमत)

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायत

संबंधित बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सोलापूर जिल्हात ‘या’ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा शंखनाद; आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; असा आहे निवडणूक कार्यक्रम..

April 7, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

स्मशानभूमी नाही तर निधी नाही! पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्ह्यासाठी ‘पॉवरफुल’ निर्णय; मैं जो बोलता हूँ.. वो मैं करता हूँ..

April 10, 2026
Next Post
काळजी घ्या! सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, मदतीसाठी टोल फ्री क्रमांक जारी

बाबो..! सोलापूर जिल्ह्यातील 'कर्नाटकप्रेमी' बनलेल्या ग्रामपंचायती बरखास्त करण्याच्या हालचाली; ठराव केलेल्या गावांची माहिती वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवली जाणार

ताज्या बातम्या

जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 13, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा