mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर शहर व ग्रामीणमध्ये 154 जण कोरोना पॉझिटिव्ह; ‘या’ भागातील 11 जणांचा मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 18, 2020
in सोलापूर

सोलापूर शहरात व जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 154 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 11 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.यामध्ये ग्रामीण भागामध्ये  120 जण व शहरात 34 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे.

आज ग्रामीण भागात एकूण 1 हजार 399 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह तर 120 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाल्यामुळे 24 हजार 421 जणांना आपापल्या घरी सोडले आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज झालेल्या अहवालानुसार बाधितांची संख्या आता 28 हजार 923 एवढी झाली आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागात आत्तापर्यंत 823 जणांचा बळी गेला आहे. वेगवेगळ्या रुग्णालयात अद्यापही कोरोनाग्रस्त असल्यामुळे तीन हजार 679 जणांवर उपचार सुरू आहेत.

आज ‘या’ दहा जणांचा मृत्यू

पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील 65 वर्षांचे पुरुष, गादेगाव (ता. पंढरपूर) येथील 65 वर्षाचे पुरुष, नेवरे (ता. माळशिरस) येथील 65 वर्षाचे पुरुष, खिलारवाडी (ता. सांगोला) येथील 50 वर्षाची महिला, बेंबळे (ता. माढा) येथील 66 वर्षांची महिला,

तर पंढरपूर शहरातील रोहिदास चौक येथील 65 वषाचे पुरुष, गवत्या मारुती चौक मोहोळ येथील 65 वर्षाचे पुरुष, प्रदक्षिणा रोड पंढरपूर येथील 78 वर्षाची महिला, कोरवली (ता. मोहोळ) येथील 45 वर्षाचे पुरुष तर वागदरी (ता. अक्कलकोट) येथील 65 वर्षाच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात 34 जण पॉझिटिव्ह

सोलापूर शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. मात्र, आता कोरोना रुग्णाच्या संपर्कातून कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसून येत आहे.

आज (रविवारी) 320 संशयितांची टेस्ट करण्यात आली असून त्यात 34 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये रुग्णांच्या संपर्कातून 14 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

त्यात अंत्रोळीकर नगरात दोन, वानकर वस्ती परिसरात (देगाव) तीन, निलम नगरात चार, निराळे वस्ती परिसर, करंजकर सोसायटी (शेळगी) येथे प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

शहरात आज रंगराज नगर, लिमयेवाडी, विशाल नगर (जुळे सोलापूर), माणिक चौक (शुक्रवार पेठ), अंत्रोळीकर नगर, वानकर वस्ती (देगाव), उमा नगरी (मुरारजी पेठ), निला नगर, रुपाभवानी रोड, रेल्वे लाईन्स, कर्णिक नगर, अभिषेक नगर (जुना पुना नाका), वसंत विहार भाग- तीन,

तर आसरा चौक, लक्ष्मी नगर (बाळे), अमर नगर (बसवेश्‍वर नगर), स्वामी विवेकानंद नगर, प्रियदर्शनी नगर (जुना विडी घरकूल), निलम नगर, दमाणी नगर, करंजकर सोसायटी (शेळगी), आदित्य अपार्टमेंट (लष्कर), शाहीर वस्ती येथे नवे रुग्ण सापडले आहेत.

तर भवानी पेठ परिसरातील वर्धमान नगरातील 64 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरातील 94 संशयित होम क्‍वारंटाईन असून 103 संशयित इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत.(सकाळ)

Solapur city and rural 154 corona positive 11 corona killed today

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur city and rural 154 corona positive 11 corona killed today

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

​शिष्यवृत्ती परीक्षेलाही ‘कॉपी’चा विळखा! सोलापूर जिल्ह्यात उत्तरांची खिरापत; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करा

February 23, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​काळीज पिळवटून टाकणारी घटना! “हातावर मृत्यूचा मजकूर लिहून विवाहितेची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यात शोककळा”; मृत्यूचे नेमके कारण काय?

February 23, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या सदस्यांची जात वैधता पडताळणी होणार; सदस्यांची यादी मागितली

February 22, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! दहावीच्या परीक्षेत १० ‘मुन्नाभाई’; तरुणीसह २० जणांवर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; केंद्र संचालकांच्या सतर्कतेने मोठा रॅकेट उघड

February 21, 2026
सोलापुरात गोपीचंद पडळकरांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर ‘धनगर’ समाजाच्या नेत्यांनीच केला संयोजकावर खुनी हल्ला

​सासूचा जीव घ्यायला निघाली, कुंकूच पुसलं गेलं! विषप्रयोग फसला, नराधम पत्नीचा सुसंस्कृत चेहरा बेनकाब; पत्नी, प्रियकराविरुद्ध महिन्यानंतर गुन्हा दाखल

February 20, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

जिल्हा नियोजनाचा ‘रिमोट कंट्रोल’ कोणाकडे? ४० जागांसाठी ‘या’ महिन्यात निवडणूक; गुडघ्याला बाशिंग बांधून नेते तयार; पालकमंत्र्यांकडे आतापासून फिल्डिंग

February 18, 2026
Next Post

मुलगी जन्माला येताच मिळणार 11 हजार रुपये; पालकांना करावे लागणार 'हे' छोटेस काम

ताज्या बातम्या

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

खुशखबर! मंगळवेढ्यात घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत वाळू; असा असेल वेळापत्रक…; तहसीलदार मदन जाधव यांचा मोठा निर्णय

February 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

व्यावसायकांनो! मंगळवेढा शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नगराध्यक्ष मैदानात; फेरीवाल्यांना दिल्या महत्त्वपूर्ण सूचना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! सगळे जण शेतातून पळत होते, अचानक मोठा आवाज झाला अन् सगळेच हादरले

February 24, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; उर्वरित भागात कसं असेल हवामान

February 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा