
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहराला ओव्हरटेक करत ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले असून मृत्युदर ही थांबता थांबेना आज पुन्हा 8 जणांचा मृत्यू झाला असून 291 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 4 हजार 875
‘या’ गावात कोरोनाचे बळी
मंगळवेढ्यातील लक्ष्मी दहिवाडी 66 वर्षीय पुरुषाचा, बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमधील 50 वर्षीय पुरुषाचा, हिरेमठ हॉस्पिटलमधील 67 वर्षीय पुरुषाचा, घारी येथील 87 वर्षीय पुरुषाचा, दत्त नगरातील 63 वर्षीय पुरुषाचा, आडवा रस्ता परिसरातील 60 वर्षीय पुरुषाचा, माळशिरसमधील लवंग येथील 73 वर्षीय पुरुषाचा आणि अकलूज येथील 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
‘या’ भागात आढळले नवे रुग्ण
मंगळवेढ्यातील अंधळगाव, अरळी, कर्जाळ, मरवड, पंढरपूर रोड, सलगर बु., मोहोळमधील अनगर, हराळवाडी, पाटकूल, वडवळ, उत्तर सोलापुरातील गावडी दारफळ, कळमण, साखरेवाडी, पंढरपुरातील आढीव, अनिल नगर, भोसे, गांधी रोड, इंदिरा गांधी भाजी मार्केट, जुना कराड नाका, जुना सोलापूर नाका, जुनी पेठ, करकंब, खेड भोसे, कोळी गल्ली, लिंक रोड, महाद्वार, महात्मा फुले नगर, मेंढापूर, नागपूरकर मठ, नाथ चौक, केबीपी कॉलेजजवळ, एमएसईबीजवळ, पिराची कुरोली, रामबाग, रोपळे, संतपेठ, सावरकर नगर, सावता माळी मठ, शेगाव दु., उमडे गल्ली, विरसागर नगर, सांगोल्यातील बलवडी, चिंचोळी रोड, यलमार मंगेवाडी, दक्षिण सोलापुरातील बोरामणी, औज आ., मंद्रूप, वळसंग आणि नवीन विडी घरकूल तर
अक्कलकोटमधील बॅंक ऑफ इंडिया, हत्तीकणबस, जेऊर, किणी, कोर्सेगाव, बार्शीतील बावी, भवानी पेठ, चिंचोली, धामणगाव, घारी, हालदुगे, इर्ले, जळगाव, कुसळंब, मंगळवार पेठ, मळेगाव, मुंगशी, राऊत गल्ली, सनगर गल्ली, सारोळे, सासुरे, सोलापूर रोड, सौंदरे, तावडी, उंबरगे, तडवळे, उपळे दुमाला, वैराग, वाणी प्लॉट, यशवंत चौक येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.
करमाळ्यातील भीम नगर, दहिगाव, फंड गल्ली, गणेश नगर, कानड गल्ली, कृष्णाजी नगर, नवीन नगरपालिकेसोर, शेळगाव (वा) सिध्दार्थ नगर, सुमंत नगर येथे माढ्यातील भांगे गल्ली, उपळाई बु. दारफळ, मानेगाव, कुर्डूवाडीतील परंडा रोड, सातव कॉलनी, शिवप्रतिष्ठान येथे नवे रुग्ण सापडले. तर माळशिरसमधील अकलूज, बोरगाव, गिरझनी, कन्हेर, लवंग, महाळूंग, माळीनगर, माळखांबी, नेवरे, संगम, सवतगाव, शिंदेवाडी, वेळापूर, विझोरी, वाफेगाव या ठिकाणी नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













