mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

उजनी पाणलोट क्षेत्रात संततधार, दौंडमधून उजनीत ‘एवढा’ क्युसेक विसर्ग; पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 22, 2021
in सोलापूर
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

टीम मंगळवेढा टाईम्स ।

चालू हंगामात उजनीत दौंडमधून 9 हजार 40 क्युसेकचा विसर्ग चालू झाला असून आजपासून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असल्याने भीमा पात्रावरील धरणांतील पाणीठ्यात वाढ दिसून येत आहे.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होण्याची शक्यता निर्माण होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत उजनी धरणात 2.5 टक्के पाणीसाठा वाढला असून आतापर्यंत 97 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे. त्याचाही परिणाम उजनी पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.

सद्यस्थितीला उजनी धरणाची टक्केवारी तब्बल उणे 24 टक्क्यांपर्यंत गेली होती. त्यात वाढ होऊन ती 14.16 टक्के वर आली आहे. त्यामुळे उजनी पाणीसाठ्याचा प्रवास वजामधून अधिककडे होण्यास प्रारंभ झाला आहे.

भीमा नदीच्या खोर्‍यात असलेल्या सर्व धरणांमध्ये 21 जून रोजी एकूण 19 धरणांपैकी 18 धरणांचा उपयुक्त पाणीसाठा आहे. खोर्‍यातील सर्वात मोठ्या असलेल्या उजनी धरणात मात्र उणे 14.16 टक्के टक्के इतका पाणीसाठा आहे. उर्वरित 19 धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत समाधानकारक पाणीसाठा आहे.

गेल्या 3 वर्षांत पाऊस लांबत गेल्याने भीमा नदीच्या खोर्‍यात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्यावर्षी परतीच्या पावसाचा मुक्काम लांबला आणि त्यामुळे पाणी वापरही नियंत्रित झाला. यंदाच्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात झालेला वादळी पाऊस यामुळे शेतीच्या पाण्याची मागणी कमी झाली आहे.

यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांमध्ये मिळून 21 जून रोजी तब्बल सहा दलघमी पाणीसाठा आहे.

उजनी वगळता वरील 19 धरणांमध्ये सरासरी 40 ते 50 टक्के इतका पाणीसाठा दिसून येतो. साधारणपणे मोसमी पाऊस सक्रिय होताना धरणांमध्ये एवढा पाणीसाठा नसतो, असे निरीक्षण जलसंपदा विभागाने नोंदवले आहे.

उजनीत दौंड येथून येणार्‍या विसर्गाला सुरुवात झाल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या उजनीच्या पाणीसाठ्यात येत्या दोन दिवसांपासून हळूहळू वाढ होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरीवर्गाचे उजनी धरण 100 टक्के यावर्षी भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उजनी धरणपाणीसाठा

संबंधित बातम्या

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

September 10, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

September 9, 2025
‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

‘फार्मर मॉल’ची रील बनवा अन् मिळवा लाखोंची बक्षीस; ‘फार्मर मॉल’ कडून स्पर्धेची घोषणा; प्रत्येकाला कॉलेज बॅग, छत्री मोफत; विजेत्यांना आ.आवताडेंच्या हस्ते मिळणार बक्षीस; 9970304605 नंबरवर पाठवा रील

September 8, 2025
कामाची बातमी! चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांच्या वाढदिवसानिमित्त सूर्योदय अर्बन व एल.के.पी मल्टिस्टेट बँकेत 1 हजारांच्या आरडी वरती 2 ग्रॅम चांदीचे नाणं मोफत

सूर्योदय अर्बन आणि एलकेपी मल्टीस्टेटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आज आयोजन; गौरी गणपती सजावट स्पर्धेचे होणार वितरण

September 7, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

मराठा आरक्षणाची प्रत्येक तालुक्यात किमान ‘इतके’ हजार प्रमाणपत्र वाटप करा; महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांचा आदेश; सेवा पंधरवडा राबवला जाणार

September 6, 2025
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

मोठी बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘डीजे’ बंदी आदेशावर कोर्टाचे शिक्कामोर्तब; स्थगितीची याचिका फेटाळली

September 5, 2025
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

सोलापूर जिल्ह्यातील ५८ गावे हैदराबाद संस्थांनच्या गॅझेटमध्ये; कुणबी दाखला मिळू शकतो; ‘या’ तालुक्यातील नोंदीचा पुरावा ग्राह्य धरणार

September 3, 2025
वीस दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीची एकविसाव्या दिवशी प्रियकरासह आत्महत्या

डोक्यावर कर्जाचा डोंगर! अतिवृष्टीमुळे पिकांची हानी झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने घेतला गळफास; लाख रुपये उसने घेऊन पडलेला बोर पडला बंद; पीक वाया गेल्याने उचलले पाऊल

September 4, 2025
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

धक्कादायक! एकाच कुटुंबातील पाच जणांच्या तोंडाला फेस अन् बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने खळबळ; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू;  सोलापुरातील घटना; नेमका काय प्रकार?

September 1, 2025
Next Post
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

शेतकरी, सामान्य नागरिक, विद्यार्थी, समाजबांधव यांचे अनेक प्रश्न ऐरणीवर; केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय

ताज्या बातम्या

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

काय सांगताय..! रेडिमेड कपडे खरेदीवरती चक्क 50 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट; मंगळवेढ्यातील ‘लाळे कलेक्शन’मध्ये पैसा वसूल ऑफर सुरू

September 10, 2025
आझाद मैदान तुडुंब भरलं! मराठा बांधवांची अलोट गर्दी; टप्याटप्याने ‘इतक्या’ हजार लोकांना प्रवेश, कसं असेल आंदोलनाचं नियोजन?

मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत मोठा निर्णय झाला; गुन्हे मागे घेण्यासाठी आता नवा निकष

September 10, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

आनंदाची बातमी! महिलांना पीठ गिरणी मोफत मिळणार; राज्य सरकारचा निर्णय, कसा कराल अर्ज?

September 10, 2025
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

शेतकऱ्यांनो! ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, या रस्त्यांचे सीमांकन होऊन विशिष्ट क्रमांक येणार; मंगळवेढा तालुक्यात आजपासून शिवार फेरीचे आयोजन

September 10, 2025

सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनच्या बदल्यात मिळणार पैसे, ही एक अट असणार; नेमका काय होणार फायदा, कसा राबवला जाणार?

September 9, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मुलांना सरकारी शाळेत शिकवल्यास करामध्ये मिळणार ५०% सूट; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

September 9, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा