टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर शहर व जिल्ह्यात रविवारी २४ तासात २२४ जण कोरोनामुक्त झाले.१८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर पाचजणांचा बळी गेला आहे. रविवारी शहरामध्ये ६६९ जणांचे अहवाल प्राप्त झाले.त्यापैकी ६१५ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. In Solapur, 224 people recover ied without corona in 24 hours, 185 were injured
यामध्ये २८ पुरुष व २६ महिला आहेत . विजापूर रस्त्यावरील कमला नगर भागातील ७२ वर्षीय महिलेचा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तसेच दिलासादायक बाब म्हणजे शहरामध्ये गेल्या चोवीस तासात १३० जण कोरोनामुक्त झाले आहेत.यामध्ये ६९ पुरुष व ६१ महिला आहेत.
आतापर्यंत शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५१०४ इतकी झाली आहे . यामध्ये २९८१ पुरुष व २१२३ महिला आहेत . आतापर्यंत ३६५ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये २४० पुरुष व १२५ महिला आहेत. १५४८ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यामध्ये ८८९ पुरुष व ६५९ महिला आहेत तर ३१९१ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. यामध्ये १८५२ पुरुष व १३३९ महिला आहेत.
ग्रामीण भागामध्ये रविवारी १२०६ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर १३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.यामध्ये ८० पुरुष व ५१ महिला आहेत. रुग्णालयातून बरे झालेल्या ९४ जणांना घरी सोडण्यात आले आहे.यामध्ये ५३ पुरुष व ४१ महिला आहेत तर चौघांचा मृत्यू झाला असून यामध्ये तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
बार्शी तालुक्यातील वैराग येथील ७० वर्षांची महिला,बार्शी येथील सुभाष नगरातील ६५ वर्षांचा पुरुष ,उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथील ७८ वर्षांचा पुरुष व अक्कलकोट येथील समर्थ चौक मेन रोड येथील ६५ वर्षांच्या पुरूषाचा मृत्यू झाला आहे.या चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या ३९४३ इतकी झाली आहे तर मृतांचा आकडा ११२ वर पोहोचला आहे. १५८३ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. २२४८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
(Source : sanchar)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज