टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुनर्रचित हवामानावर आधारित फळपेत विमा योजना रब्बी हंगाम २०२३ साठी फळ पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर झाला असून ६ कोटी ४५ लाख ४८ हजार ५१४ विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वर्ग होणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील १००४ शेतकऱ्यांनी या फळ पिक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवला होता त्या शेतकऱ्यांनी एकूण ७५२ हेक्टर क्षेत्रावर हा फळ पिक विमा भरला होता.
यामध्ये द्राक्षासाठी ३०५ शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्या शेतकऱ्यांना १ कोटी ८९ लाख २४ हजार २२७ रुपये मंजूर झाले आहेत आंबा उत्पादक ३५ शेतकऱ्यांना ४ कोटी ४९ लाख ४२ हजार ८३८ रुपये
तर डाळिंब उत्पादक ६६४ शेतकऱ्यांना ४ कोटी ४९ लाख ४२ हजार ८३८ रुपये मंजूर झाले आहेत असा एकूण १००४ शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील आंबे बहार फळपीक विमा मंजूर झाला असून
ही मंजूर रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे आमदार समाधान आवताडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज