टीम मंगळवेढा टाईम्स ।
सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि . कारखान्याने मुख्य मार्गदर्शक प्रा . शिवाजीराव काळुंगे यांचे मार्गदर्शनानुसार गळीत हंगाम सन २०२१-२०२२ मध्ये ३५४०१८.६८६ मे.टन गाळप केलेले असुन को-जन प्रकल्पातुन १६११६६०० युनिट विज वितरीत केलेली आहे.
या हंगामात गाळप झालेल्या ऊसाची १०० टक्के एफ.आर.पी रक्कम अदा केली असुन , बैल पोळा सणासाठी गाळप हंगाम सन २०२१-२०२२ मध्ये गाळपास आलेल्या ऊसास प्र.मे.टन रक्कम रु १०० प्रमाणे रक्कम संबधित शेतकऱ्यांचा बँक खातेवर जमा केलेली आहे.
कारखान्याचे गळीत हंगाम सन २०२२-२०२३ साठी मशिनरी ओव्हर हॉलिंग , मेन्टन्सची कामे पुर्ण झालेली असुन या हंगामात अंदाजे ५५०००० मे . टन ऊस गाळप करण्याचे तसेच सहविज निर्मिती प्रकल्पातुन ३ कोटी युनिट विज एक्सपोर्ट करण्याचे उद्दिष्ट आहे.
कारखान्याने येणारा गाळप हंगाम पार पाडण्या करीता सक्षम ऊस तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार पुर्ण केलेले आहेत.
सदर वाहनासाठी अॅडव्हान्स चा दुसरा हप्ता वाटप केलेला आहे . या हंगामात जास्तीत जास्त शेतक यानी सिताराम कारखान्यास ऊस देवुन सहकार्य करावे असे. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ . राजलक्ष्मी गायकवाड व जनरल मॅनेजर हणमंत पाटील यांनी आवाहन केले .
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज