टीम मंगळवेढा टाइम्स
सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे पाच दिवस रजेवर असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
मनीषा आव्हाळे प्रांताधिकारी असताना त्यांच्याकडे काही दिवसांसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा पदभार देण्यात आला होता. २१ जुलै रोजी त्यांचे प्रमोशन होऊन त्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर झाली.
प्रणिती शिंदे यांनी दिला इशारा
शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्यानंतर त्या आक्रमक झाल्या आहेत. नुकताच रमाई आवास योजनेतील अडचणींबाबत त्यांनी समाजकल्याण खात्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रमाई आवास योजनेसाठी आलेला २३ कोटींचा निधी वाटप झाला नाही. हा लवकरात लवकर निधी वाटप न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध हक्कभंगाचा ठराव आणणार असल्याचा इशारा शिंदे यांनी दिला.
या योजनेत मोठा भ्रष्टाचार असून, मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा केल्याचा त्यांनी आरोप केला आहे. हा निधी का आणि कसा परत गेला, याला जबाबदार कोण आहे? अशी कुजबुज लाभार्थी सदस्यांमधून होत होती.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज