मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यात मराठा आरक्षण मुद्दा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आज मंगळवेढा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात देखील आला आहे.
दरम्यान, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे संचालक व खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी उद्या दि.1 नोव्हेंबर रोजी दामाजी चौकात उपोषण करून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांनी काढलेल्या प्रसिध्द पत्रकांत म्हंटले आहे की, मी सिद्धेश्वर बबनराव आवताडे, माझ्या वरती प्रेम करणाऱ्या सर्व मित्रपरिवार व हितचिंतक यांना नम्र विनंती आहे की उद्या १ नोव्हेंबर रोजी असणारा वाढदिवस साजरा करणार नाही.
मराठा आरक्षणाकरिता संपूर्ण मराठा समाजाने आता वज्र मूढ बांधली आहे. त्या करिता मराठा योद्धा “ मनोज जरांगे पाटील “ यांचे आपल्या समाजासाठी आमरण उपोषण चालू आहे.
प्रत्येक माणूस हा समाजाचाच एक भाग आहे. म्हणून मी सुद्धा एक मराठा आहे म्हणून उद्या सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत मराठा आंदोलनाच्या ठिकाणी बसून मी माझा वाढदिवस साजरा करणार आहे.
तरी मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील सर्वांना मी आव्हान करतो की तुम्ही पण मराठा योद्धा मनोज जारंगे पाटील यांना पाठिंबा देत आपल्या सर्वांना आरक्षण मिळाले पाहिजे या साठी लढूया, आणि माझा मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि या आधी पण दिलेला आहे.
मला अस वाटत की माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण मिळाल पाहिजे. माझा वाढदिवस करण्यापेक्षा माझ्या बरोबर 10 ते 6 या वेळेत या आंदोलनामध्ये सहभागी व्हा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
दरम्यान, चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून केले जात आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज