टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगळवेढा तालुक्यातील सिद्धापूर येथील मातुलिंग गणपतीची मकरसंक्रांतीला भरणारी यात्रा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रद्द करण्यात आल्याचे पत्रक यात्रा कमिटीचे अध्यक्ष भीमगोंडा पाटील यांनी दिले.
दि.१४ जानेवारी व दि.१५ जानेवारी रोजी ही यात्रा सिध्दापूर येथे होणार होती.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अनेक यात्रा वर मोठे संकट कोसळले आहे.
त्यामुळे मार्च २०२० पासून यात्रेच्या माध्यमातून वर्षाचे आर्थिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना याचा फटका बसला आहे.
मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मीदहीवडी , हुलजंती , हुन्नूर , मारोळी, गैबीपीर ऊरूस , संत दामाजी यात्रा या मोठ्या यात्रेवर त्याचा प्रारंभ झाला आहे. सिद्धापूर येथील मकर संक्रांतीला भरणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाविकांनी गर्दी करू नये , असे आवाहन पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे व देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले. हा निर्णय यात्रा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला.
सदरबाबत दि. ८ जानेवारी रोजी उपविभागीय दंडाधिकारी उदयसिंह भोसले, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे, श्री मार्तुलिंग देवस्थान कमिटी सदस्य मौजे सिध्दापूर यांचेत झालेल्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच सदर बाबत संबंधित यात्रा कमिटी यांनी यात्रा रद्द केलेबाबत निवेदन दिलेले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज