टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील चेळेकर गल्ली येथील सिध्दनाथ ज्वेलर्सची रौप्यमहोत्सवीची धमाका योजनेचा ग्राहकांना लाभ होणार असल्याचे प्रतिपादन जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी केले.
रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सिध्दनाथ ज्वेलर्सतर्फे खास ग्राहकांसाठी लाखो रुपयांच्या बक्षीसाच्या योजनेच्या शुभारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विश्वासार्हता,शुध्दता, ग्राहकाभिमुख सेवा, हॉलमार्किंग दागिन्याची पेढी, सोने व चांदीसाठी स्वतंत्र दालन असणारे सिध्दनाथ ज्वेलर्स यांनी २५ वर्षे संपवून २६ वर्षात पदार्पण केले असून या निमित्ताने ग्राहकहित डोळयासमोर ठेवून खास ऑफरचा शुभारंभ करण्यात आला.
सोन्याच्या दागिन्याच्या १० हजार रुपयांच्या व चांदीच्या ज्वेलरी ५ हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर सोडतीव्दारे आपण बुलेट अॅक्टिव्हा , एसी , टी.व्ही , फ्रीज अशी २५ बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
याचा कालावधी २५ मार्च ते ३१ मेपर्यंत असून सुवर्ण संचय योजनेत सहभागी होणाऱ्या ग्राहकांना पैठणी साडी भेट म्हणून देण्यात येईल अशी माहिती सिध्दनाथ ज्वेलर्सचे रावसाहेब चव्हाण पाटील व संचालक धीरज चव्हाण पाटील यांनी यावेळी दिली.
कार्यकारी अभियंता प्रगती रणजित पाटील,भालेवाडी गावच्या सरपंच सविता प्रताप भोसले,इंजिनिअर शाम चव्हाण,राजेंद्र चेळेकर,उद्योजक कन्हैया हजारे,शिवाजी बापू पाटील, नारायण पाटील, सतीश हजारे,दत्ता चव्हाण,नाना चेळेकर,संजय गाढवे, संजय चौगुले,उद्योजक विकास माने,सिध्देश्वर जाधव,माजी सैनिक शंकर जाधव,दिलीप जाधव,प्रभाकर लिगाडे,नितीन सुरवसे, माजी नगरसेवक सुनील भगरे, शारदा घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बाजीराव चव्हाण-पाटील,धीरज चव्हाण-पाटील, शरद चव्हाण-पाटील, रंणजीत चव्हाण-पाटील,प्रदीप चव्हाण-पाटील,सत्यजित चव्हाण-पाटील,सौ.सुनीता चव्हाण-पाटील यांचे मोलाचे योगदान लाभले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज नारायण जोशी यांनी केले तर आभार शरद चव्हाण-पाटील यांनी मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज