मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा शहरातील धर्मगाव रोड येथील श्री मल्लिकार्जुन अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी मंगळवेढाच्या स्थलांतर सोहळा आज रविवार, 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या उद्घाटन सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव बिराजदार गुरुजी व चेअरमन अप्पाराया बाळासाहेब कपले यांच्या नेतृत्वाखाली मोठा उत्साह दिसून येत आहे.
उद्घाटनास विशेष मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी, सर्व संस्था, बँकांचे चेअरमन आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे सर्व व्हा. चेअरमन विमल महादेव बिराजदार व संचालक मंडळाने सर्व सभासद व नागरिकांना या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
बँकेच्या योजना आणि सेवा:
*सोनेतारण कर्ज:*
आकर्षक कमीत-कमी व्याजदरात सोनेतारण कर्जाची सुविधा उपलब्ध.
दामदुप्पट ठेव योजना:
6 वर्षे 6 महिन्यात ठेवीची रक्कम दुप्पट मिळण्याची योजना नागरिकांसाठी उपयुक्त ठरेल.
आकर्षक व्याजदर:
30 दिवसांच्या ठेवीसाठी 7%
46 दिवसांच्या ठेवीसाठी 8%
3 महिने 9%
6 महिने 9.5%
13 महिने पुढे 11%
ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक व्याज.
*मासिक प्राप्ती योजना:*
1 लाख रुपये 24 महिन्यांसाठी ठेवा आणि दरमहा 1000 रुपये मिळवा.
डिजिटल बँकिंग सुविधा:
बँकेने अत्याधुनिक डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत, ज्या एका मोबाईल ॲपमध्ये उपलब्ध आहेत:
IMPS, NEFT, RTGS, QR कोडद्वारे व्यवहार, वीज बिल, फोन बिल आणि विमा भरणा सुविधा
व्यापारी व शेतकऱ्यांसाठी विशेष योजना:
सोनेतारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, ठेव तारण कर्ज, मासिक ठेव योजना आणि दुग्ध व्यवसायासाठी कर्ज यांसारख्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
संस्थेचा विश्वासार्ह आणि पारदर्शक कारभार:
श्री मल्लिकार्जुन अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा सभासद व ठेवीदारांच्या विश्वासामुळे अल्पावधीतच मोठ्या उंचीवर पोहोचली आहे. आकर्षक व्याजदर, तत्पर सेवा आणि कर्जपुरवठ्यामुळे ही संस्था ओळखली जाते.
कार्यक्रमाचे ठिकाण:
दामाजी नगर, धर्मगाव रोड, पंढरपूर-सोलापूर बायपास जवळ, मंगळवेढा
वेळ: सकाळी 11 वाजता
सभासद व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, चेअरमन, व्हॉ. चेअरमन, संचालक मंडळाने केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज