बारामती :
बारामतीत लँडिंगदरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला आहे. हे छोटे विमान कोसळल्यानंतर त्याला आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल होणार होते.

विमान लँडिंग वेळी हा अपघात झाला. या दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात ६ प्रवाशांचा मृत्यू झाला.

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या विमान अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा लॅण्डिंगआधी भीषण अपघात झाला. बारामतीमध्ये हा अपघात झाला.

या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एका शेतात हे विमान लॅण्डिंगदरम्यान कोसळलं आहे.

या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस व मदत यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हा अपवाद नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळत नाही, मात्र वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ माजली असून बारामतीकरांनी अपघात ग्रस्त ठिकाणाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असून अजित पवार यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे या घटनेने बारामतीकरांना कमालीसा धक्का बसला आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज













