टीम मंगळवेढा टाईम्स :
मंगळवेढा शहरातील शनिवार पेठ परिसरात एका ४६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ईरबसप्पा सिद्राम घटनटे (वय ४६, रा. शनिवार पेठ, मंगळवेढा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. आज शनिवार, दि. २८ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास ईरबसप्पा यांनी आपल्या राहत्या घराचा दरवाजा आतून लावून घेतला होता.

बराच वेळ झाला तरी दरवाजा उघडत नसल्याने त्यांच्या आईने (भौरम्मा घटनटे) त्यांचे मामा व निवृत्त सैनिक सिद्धेश्वर ईराप्पा कनुरे यांना पाचारण केले.

दरवाजा तोडला अन काळजाचा ठोका चुकला!
मृताचे मामा सिद्धेश्वर कनुरे आणि इतर नातेवाईकांनी मिळून घराचा दरवाजा जोरात ढकलून उघडला असता, आत अत्यंत विदारक दृश्य पाहायला मिळाले.

ईरबसप्पा यांनी छताच्या लाकडी वाशाला पांढऱ्या दोरीने गळफास घेतला होता. त्यांना तातडीने खाली उतरवून उपचारासाठी मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
ईरबसप्पा यांनी हे टोकाचे पाऊल नेमक्या कोणत्या कारणातून उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.

सिद्धेश्वर कनुरे यांनी दिलेल्या खबरीवरून मंगळवेढा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











