मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
दारुड्या मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका आईने थेट त्याचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. ही घटना भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धावरी गावात घडली असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे.
मृत तरुणाचे नाव बालाजी राऊत असं असून, तो नेहमीच दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. त्याच्या या वर्तणुकीमुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झालं होतं. वारंवार होणाऱ्या घरगुती हिंसाचारामुळे वैतागलेल्या आईने अखेर टोकाचं पाऊल उचललं.
घरगुती वादातून तिने धारदार शस्त्राने वार करत बालाजीची हत्या केली. या घटनेनंतर मयताच्या भावाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने धावरी गावात खळबळ उडाली आहे.
नक्की काय झालं?
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर तालुक्यातल्या धावरी गावात ही धक्कादायक घटना घडली. बालाजी राऊत असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तो गेल्या काही वर्षांपासून दारूच्या नशेत घरात सतत त्रास द्यायचा. बालाजी राऊत हा दारू पिऊन सातत्याने घरात मारझोड करत असे. त्याच्या या त्रासाला वैतागून गेलेल्या जन्मदात्या आईने धारदार शस्त्राने वार करत त्याची हत्या केली.
घटनेच्या दिवशीही तो नेहमीसारखा नशेत घरी आला आणि आईशी वाद घालायला लागला. या वादात त्याने आईवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संतापलेल्या आईने शेजारीचं धारदार शस्त्र उचललं आणि त्याच्यावर वार केले.
या हल्ल्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. मृत तरुणाच्या भावाने पोलिसांत तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज