mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

युवा सेनेच्या जिल्हाप्रमुखांवर हल्ला; शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकरसह सात जणांवर गुन्हा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 17, 2021
in क्राईम, सोलापूर
संतापजनक! मंगळवेढ्यात अठरा वर्षीय मुलीवर अत्याचार; दोघाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल

टीम मंगळवेढा टाईम्स ।

युवा सेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, त्यांचे बंधू दत्तात्रय वानकर, वडील प्रकाश वानकर यांच्यासह इतर चारजणांविरूध्द फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

परंतु, काळजेंनी प्रसिध्दीसाठी बनाव केला असून पोलिस तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. ते स्वत:हून पोलिसांत हजर होणार आहेत.

काळजे यांच्या फिर्यादीनुसार, युवा सेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून माझ्याकडे अक्कलकोट व दक्षिण सोलापूर या दोन्ही तालुक्‍यांची जबाबदारी आहे.

शिवसेनेत माझी प्रतिमा दिवसेंदिवस चांगली होत असून कार्यकर्त्यांची संख्याही वाढू लागली आहे. माझ्या शब्दाला वरिष्ठ पातळीवर मान वाढत आहे. या द्वेषातून त्यांनी देगाव रोडवरील इंद्रधनू अपार्टमेंटसमोर माझ्यावर हल्ला केला.

देगाव येथील शेतातून चारचाकी वाहनातून (एमएच 23, डी 808) घराकडे येताना आरोपींनी गाडीला ओव्हरटेक करून त्यांचे वाहन आडवे लावले.

प्रकाश वानकर यांनी गाडीतून खाली उतरण्यास सांगून शिवीगाळ केली. त्यांनी काचेवर जोरात हात मारला. खाली उतरल्यावर मनगट धरून तोंडावर चापट मारली. दत्तात्रय वानकर यांनी गाडीचे लॉक काढून गाडीतून उतरून पळून जाताना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

पिस्टलसारखे शस्त्र उलटे करून तोंडावर मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत काळजी यांनी नमूद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी

युवा सेनेचे पदाधिकारी मनिष काळजे यांच्यावर इंद्रधनू अपार्टमेंटसमोर हल्ला झाल्याची फिर्याद दाखल झाली आहे. त्यानुसार संशयित आरोपींचा तपास केला जाईल.

परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे, त्यांचे मोबाइल टॉवर लोकेशनची पडताळणी केली जाणार आहे, असे तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक काळे यांनी सांगितले.

दरम्यान, पारदर्शक तपासातून पोलिसांनी वस्तूस्थिती समोर आणावी, अशी मागणी शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्‍तांकडे केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शिवसेनासोलापूर

संबंधित बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
चमकदार कामगिरी! सोलापूर पोलिसांनी उध्वस्त केला बनावट नोटांची छपाई करणारा अड्डा

खळबळजनक! खोटा व न वटणारा चेक दिल्याप्रकरणी आरोपीस दोन वर्षे सश्रम कारावास

February 9, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

कामाची बातमी! मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी बॅलेट पेपरवर दोन रंगांची रचना; जि. प. गटांचे उमेदवार पांढऱ्या, तर पं. स. गणांचे गुलाबी रंगात

February 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! नुकतेच संसार थाटलेल्या एका तरुण मजुराचा विमानतळावर डोक्यात दगड पडल्याने मृत्यू; सोलापूर विमानतळावर दुर्दैवी मृत्यू हृदय पिळवटून टाकणारा ठरला

January 29, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

खळबळ! मंगळवेढ्यात पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा; 4 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त केला; अवैध धंद्याची माहिती स्थानिक पोलीसांना कशी काय होत नाही?

January 25, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

भयंकर! महिलेने Ex अन् नवऱ्याच्या मदतीने दुसऱ्या बॉयफ्रेंडला संपवलं; मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

January 24, 2026
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

खळबळजनक! पंचायत समिती उमेदवारी अर्जासाठी मागितली लाच; महसूल सहायकाला रंगेहाथ पकडले

January 23, 2026
Next Post
रुग्णांची लूट! कोरोना काळात 90 टक्के लॅबवाले बोगस? लॅब चालकांचा गोरख धंदा जोरात; कसी ओळखाल नोंदणीकृत लॅब

काळजी घ्या! मंगळवेढा तालुक्यात निघाले 'एवढे' रूग्ण काेराेना पाँझीटीव्ह; एकाचा झाला मृत्यू

ताज्या बातम्या

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

लक्ष्मीदहिवडी गटाचा चेहरा बदलणार! कृतज्ञता दौऱ्यातून सर्वांगीण विकासाचा शब्द; २१ गावांना भेट देऊन जनतेचे मानले आभार; करूणाताई शिवशरण यांचा झंझावाती दौरा

February 12, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाचे वादळ आता शिवरायांच्या चरणी! “शिवमुर्ती प्रतिष्ठापना आणि जरांगे पाटील; मंगळवेढ्यात आज ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार व्हा

February 11, 2026
मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ मंदिरातील देवीच्या चांदीच्या पादुका चोरट्यांनी पळविल्या

हद्दच झाली! रातोरात अख्खं शेतच लंपास; चोरट्यांनी सोन्या-चांदीऐवजी पळवलं लाखो रुपयांचे ‘हिरवं सोनं’; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

February 11, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

ऐतिहासिक निर्णय! मंगळवेढ्याच्या सर्वांगीण विकासाचा ‘संकल्प’; सुनंदा आवताडे यांचा मास्टरप्लॅन; विकास कामे मार्गी लावण्यासाठी विषय सुचवण्याचे आवाहन

February 11, 2026
मंगळवेढेकरांचे स्वप्न साकार! छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वरूढ मूर्तीचे उद्या आगमन

सुवर्ण महोत्सवी शिवगर्जना! मंगळवेढ्यात शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक आणि भरगच्च कार्यक्रमांनी सजणार सुवर्ण महोत्सवी शिवजयंती

February 10, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

February 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..